coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ५ बाधितांचा मृत्यू; कोरोना बळींची संख्या ६४३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 18:55 IST2020-08-25T18:54:16+5:302020-08-25T18:55:19+5:30
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१,१७१ एवढी झाली आहे

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ५ बाधितांचा मृत्यू; कोरोना बळींची संख्या ६४३ वर
औरंगाबाद : घाटी रुग्णलयात उपचार सुरू असताना ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मयत रुग्णांची संख्या ६४३ झाली आहे.
गांधीनगर येथील ४० वर्षीय पुरुष , जवाहर कॉलनी येथील ७५ वर्षीय पुरुष, मलकापूर-गंगापूर येथील ६५ वर्षीय पुरुष , अप्पेगाव-गंगापूर येथील ५६ वर्षीय पुरुष आणि शहरातील ८२ वर्षीय महिला रुग्णाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
आज १०० बाधितांची वाढ
जिल्ह्यात मंगळवारी १०० बाधितांची भर पडली, तर पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकुण रुग्णसंख्या २१,१७१ एवढी झाली आहे. आतापर्यंत १६,१५३ रूग्ण बरे झाले आहेत, तर ६४३ जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ४३८० जणांवर उपचार सुरू आहेत.