Coronavirus : औरंगाबादेत कोरोनाबाधित ५ रुग्णांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या ४४२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 14:03 IST2020-07-26T14:02:27+5:302020-07-26T14:03:07+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ९४२ कोरोनाबाधित आढळले आहेत.

Coronavirus : औरंगाबादेत कोरोनाबाधित ५ रुग्णांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या ४४२
औरंगाबाद : घाटीत उपचार सुरू असताना ५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ४४२ झाली आहे.
जालाननगर येथील ८० वर्षीय पुरुष, इसारवाडी-पैठण येथील ७० वर्षीय पुरुष, गणेश कॉलनी येथील ७७ वर्षीय पुरुष , पंढरपूर-वाळूज येथील ५६ वर्षीय महिला आणि उस्मानपुरा येथील ६६ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुषाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने रविवारी दिली.
रविवारी ३४ बाधितांची वाढ
जिल्ह्यात ३४ रुग्णांचे अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. यात मनपा हद्दीतील ३१ तर ग्रामीण भागांतील ३ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ९४२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ८१५९ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ४३७ जणांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला ४३४६ जणांवर उपचार सुरु आहेत.