coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ४ रुग्णांचा मृत्यू; कोरोना बळींची संख्या ५६२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 19:57 IST2020-08-11T19:57:15+5:302020-08-11T19:57:39+5:30
जिल्ह्यातील ७५ रुग्णांचे अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले.

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ४ रुग्णांचा मृत्यू; कोरोना बळींची संख्या ५६२ वर
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना नांदेड येथील एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ४ कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मयत रुग्णांची संख्या ५६२ झाली आहे.
आंबेगाव-गंगापूर येथील ८० वर्षीय पुरूष, स्नेहनगर-सिल्लोड येथील ६५ वर्षीय महिला, औरंगाबादेतील गजानननगर येथील ६८ वर्षीय पुरुष, एकनाथनगर-उस्मानपुरा येथील ८६ वर्षीय पुरुष आणि तांसा, हदगाव-नांदेड येथील ५४ वर्षीय महिलेचा घाटी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
आज ७५ बाधितांची वाढ
जिल्ह्यातील ७५ रुग्णांचे अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७,१२५ झाली आहे. त्यापैकी १२,५३७ बरे झाले तर ५६२ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ४०२६ जणांवर उपचार सुरु आहे