coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 15:42 IST2020-08-27T15:41:32+5:302020-08-27T15:42:50+5:30

एकूण मृत रुग्णांची संख्या ६६३ झाली आहे.

coronavirus: 4 corona patients die in Aurangabad district | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देएकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१,९७३ झाली आहे.

औरंगाबाद : उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत रुग्णांची संख्या ६६३ झाली.

जोगेश्वरी-गंगापूर येथील ३३ वर्षीय पुरुष, स्वामी समर्थनगर-वैजापूर येथील ७६ वर्षीय महिला, वडवाणी- पैठण येथील ५८ वर्षीय पुरुष, भवानीपुरा-सोयगाव येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.

आज २१४ रुग्णांची वाढ 
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी तब्बल २१४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१,९७३ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६,७१३ रूग्ण बरे झाले आहेत. तर ६६३ जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ४५९८ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

Web Title: coronavirus: 4 corona patients die in Aurangabad district