CoronaVirus : मराठवाड्यात ३८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण; नांदेड,परभणीत अद्यापही सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 20:14 IST2020-04-13T20:11:51+5:302020-04-13T20:14:48+5:30

मराठवाड्यातून एकूण २४८२ नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

CoronaVirus: 38 corona-positive patients in Marathwada; Nanded, Parabhani still safe | CoronaVirus : मराठवाड्यात ३८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण; नांदेड,परभणीत अद्यापही सुरक्षित

CoronaVirus : मराठवाड्यात ३८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण; नांदेड,परभणीत अद्यापही सुरक्षित

ठळक मुद्देऔरंगाबाद शहरात सर्वाधिक २४ रुग्ण लातूरमध्ये ८ तर उस्मानाबादमध्ये ३ रुग्ण

औरंगाबाद: मराठवाड्यात सध्या कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांचा आकडा ३८ वर गेला असून नांदेड आणि परभणी जिल्ह्यात सध्या तरी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
विभागातील सर्वाधिक २४ रुग्ण औरंगाबाद शहरात आढळून आले आहेत. तसेच सर्वाधिक स्वॅब देखील औरंगाबादमधून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. विभागात फक्त औरंगाबादमध्ये कोरोना चाचणी करण्याची प्रयोगशाळा सध्या उपलब्ध आहे.

मराठवाड्यातून एकूण २४८२ नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. २१२७ नागरिकांचे स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आले आहेत.२८२ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. ३७ जणांचे स्वॅबचे नमुने तपासलेच नाहीत. जालन्यात १, हिंगोलीत १, बीडमध्ये १, लातूरमध्ये ८ तर उस्मानाबादमध्ये ३ रुग्ण आढळून आले आहेत. विभागात ९ हजार २३४ खाटांची सुविधा विविध हॉस्पिटलमध्य उपलब्ध आहे. तर १९७५ खाटांची आयसोलेशन सुविधा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार आहे

Web Title: CoronaVirus: 38 corona-positive patients in Marathwada; Nanded, Parabhani still safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.