coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू; एकूण कोरोना बळी ६०६ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:25 IST2020-08-19T15:23:50+5:302020-08-19T15:25:44+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९, २५८ एवढी झाली आहे.

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू; एकूण कोरोना बळी ६०६ वर
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मयत रुग्णांची संख्या ६०६ झाली आहे.
उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्यांमध्ये, बजाजनगर-वाळूज येथील ९५ वर्षीय महिला , दर्गा रोड, औरंगाबाद येथील ५६ वर्षीय पुरुष आणि जंगला तांडा, सोयगाव येथील ५० वर्षीय रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात १०६ रुग्णांची वाढ
जिल्ह्यात बुधवारी सकाळी १०६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९, २५८ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४, ४५२ रूग्ण बरे झाले आहेत, तर ६०६ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४२०० जणांवर उपचार सुरु आहेत.