coronavirus : औरंगाबाद शहरातील ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू; एकूण बळींची संख्या ६४८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 15:23 IST2020-08-26T15:18:56+5:302020-08-26T15:23:43+5:30
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या २१, ५१५ एवढी झाली आहे.

coronavirus : औरंगाबाद शहरातील ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू; एकूण बळींची संख्या ६४८ वर
औरंगाबाद : घाटी रुग्णलयात उपचार सुरू असताना ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मयत रुग्णांची संख्या ६४८ झाली आहे.
पिसादेवी -हर्सूल येथील ६० वर्षीय महिला, एन-११, सिडको येथील ७० वर्षीय महिला आणि एकतानगर-हर्सूल येथील ६३ वर्षीय महिला रुग्णाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांचे चौकशीचे आदेश #HersulJail#Aurangabadhttps://t.co/f42seuqn1M
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 26, 2020
आज १२३ बाधितांची वाढ
जिल्ह्यात बुधवारी सकाळी १२३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या २१, ५१५ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६, ४४० रूग्ण बरे झाले आहेत. तर ६४८ जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ४४२७ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात १६, ४४० रूग्ण बरे झाले आहेत. #coronavirus#Aurangabadhttps://t.co/RnmafnnZ2A
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 26, 2020