coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित ३ रुग्णांचा मृत्यू; एकूण बळींची संख्या ४११
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 14:50 IST2020-07-22T14:50:33+5:302020-07-22T14:50:57+5:30
जिल्ह्यात ९९ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले.

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित ३ रुग्णांचा मृत्यू; एकूण बळींची संख्या ४११
औरंगाबाद : घाटीत उपचार सुरू असताना ३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ४११ झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधीतांच्या मृत्यूचा दर कमी झाला आहे. मात्र, उपचारादरम्यान रोज कोरोना बळी जात आहेत. बुधवारी उपचारादरम्यान रामनगर येथील ४२ वर्षीय पुरुष, शिवनेरी कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष आणि पडेगाव येथील ५५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
बुधवारी सकाळी ९९ रुग्ण आढळले
जिल्ह्यात ९९ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ११, ७६५ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ६४९७ रूग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४०८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४८६० जणांवर उपचार सुरु आहेत.