coronavirus : शेवटचा रुग्ण सापडल्यापासून २८ दिवस कन्टेन्मेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:55 IST2020-05-28T19:54:32+5:302020-05-28T19:55:00+5:30
या नियमानुसार महापालिकेने आतापर्यंत तेवीस वसाहती कोरोनामुक्त जाहीर केल्या आहेत.

coronavirus : शेवटचा रुग्ण सापडल्यापासून २८ दिवस कन्टेन्मेंट झोन
औरंगाबाद : महापालिकेने तयार केलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये ज्या दिवशी कोरोनाचा शेवटचा रुग्ण आढळून आला तेथून २८ दिवस संपूर्ण परिसर लॉकडाऊन करण्यात येतो. या नियमानुसार महापालिकेने आतापर्यंत तेवीस वसाहती कोरोनामुक्त जाहीर केल्या आहेत.
शहराच्या नवनवीन भागांत रोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत असले, तरी दुसरीकडे अनेक वसाहती कोरोनामुक्त होत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या वसाहतींमध्ये महापालिकेने नागरिकांनी वस्तीबाहेर जाऊ नये, यासाठी लावलेले पत्रे काढलेले नाहीत. हे पत्र काढून टाकण्याची मागणी कोरोनामुक्त वसाहतींमधील नागरिकांकडून केली जात आहे. मात्र कोरोनामुक्त वसाहतीमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्याच्या तारखेपासून २८ दिवसांपर्यंत सील केलेल्या त्या वसाहती तशाच राहतील, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे कंन्टेन्मेंट झोनमधील नागरिकांना घराबाहेर पडण्याचे निर्बंध कायम असतील, असे टास्कफोर्सच्या प्रमुख तथा विधि सल्लागार अॅड. अपर्णा थेटे यांनी सांगितले.