शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

coronavirus : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत १३ विद्युत, गॅसदाहिनी; स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 5:48 PM

coronavirus : नांदेडमध्ये ३, लातूरमध्ये २, उदगीरमध्ये १, हिंगोली १, जालन्यात १, औरंगाबादमध्ये ४ आणि बीडमध्ये १ अशा १३ विद्युत व गॅसदाहिन्या होतील.

ठळक मुद्देचार महिन्यांपासून दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केले आहे.विभागात दररोज १०० ते १५० बाधितांचा मृत्यू होत आहे. उद्योजक आणि औरंगाबाद फर्स्टचे सहकार्य मिळणार

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे दररोज शंभराहून अधिक मृत्यू होत असल्यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. मृतदेहाची अवहेलना होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात विद्युतदाहिनी सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उस्मानाबाद, परभणी वगळता उर्वरित औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्ह्यामध्ये महिनाभरात दाहिन्या कार्यान्वित होणार आहेत.

नांदेडमध्ये ३, लातूरमध्ये २, उदगीरमध्ये १, हिंगोली १, जालन्यात १, औरंगाबादमध्ये ४ आणि बीडमध्ये १ अशा १३ विद्युत व गॅसदाहिन्या होतील. परभणी आणि उस्मानाबादसाठी लवकरच निर्णय होणार आहे. बीडमध्ये तांत्रिक अडचण आहे, ती पूर्ण होईल. बाकीच्या जिल्ह्यात लवकरच काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. एका रुग्णवाहिकेत एकावर एक रचून अनेक मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आले होते. या प्रकारानंतर प्रशासकीय यंत्रणेने विद्युत, गॅसदाहिनी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीला मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जि.प.सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, उपायुक्त जगदीश मिनीयार, औरंगाबाद फर्स्टचे प्रीतीश चटर्जी, मसिआचे अभय हंचनाळ, सीएमआयएचे सतीश लोणीकर, सीआयआय रमण अजगांवकर उपस्थित होते. वर्षभरापासून कोरोना महामारी सुरू असून, चार महिन्यांपासून दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केले आहे. या लाटेत रुग्णसंख्येसह मृत्यूचे प्रमाणही वाढले असून, विभागात दररोज १०० ते १५० बाधितांचा मृत्यू होत आहे. औरंगाबाद, नांदेडसारख्या जिल्ह्यांत दिवसाला २५ ते ३० रुग्ण दगावत आहेत.

स्मशानभूमीत सगळे कुटुंब राबतेकोरोनाने दगावलेल्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे थेट स्मशानभूमीत नेला जातो. बऱ्याच ठिकाणी कुटुंबातील सदस्य अंत्यविधीला नसतात. स्मशानभूमीत मृतदेह येत असल्याने जागेअभावी अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. शिवाय स्मशानजोगींचे पूर्ण कुटुंब दिवसरात्र काम करीत आहे. महिला, मुलेदेखील मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी परिश्रम घेतात. या सगळ्या परिस्थितीवर गॅस आणि विद्युतदाहिनी सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद