औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत १२०५ मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 13:55 IST2021-01-01T13:53:08+5:302021-01-01T13:55:40+5:30

Coronavirus In Aurangabad :औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ६०४ एवढी झाली आहे, तर ४३ हजार ९४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

coronavirus : 1205 deaths of corona in Aurangabad district so far | औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत १२०५ मृत्यू 

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत १२०५ मृत्यू 

ठळक मुद्देजिल्ह्यात सध्या ४५६ जणांवर उपचार सुरू आहेत गुरुवारी ६८ रुग्णांना उपचारानंतर सुटी मिळाली गुरुवारी ६० रुग्णांची वाढ; सात रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात अनेक दिवसांनंतर गुरुवारी कोरोना मृत्यूची संख्या काहीशी वाढली. औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आणि इतर जिल्ह्यांतील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ६० कोरोनारुग्णांची भर पडली, तर ६८ जण कोरोनामुक्त झाले.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ६०४ एवढी झाली आहे, तर ४३ हजार ९४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मार्चपासून आतापर्यंत एकूण एक हजार २०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ६० रुग्णांत मनपा हद्दीतील ४९, ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५७ आणि ग्रामीण भागातील ११ अशा एकूण ६८ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. रेणुकामाता मंदिर परिसर, बीड बायपास येथील ८८ वर्षीय पुरुष, टीव्ही सेंटर रोड, गणेश कॉलनीतील ६३ वर्षीय स्री, विमानतळ परिसरातील ६६ वर्षीय पुरुष, दर्गा रोड परिसरातील ८१ वर्षीय पुरुष, रेल्वे स्टेशन परिसरातील जहागीरदार कॉलनीतील ७१ वर्षीय पुरुष आणि बुलढाणा जिल्ह्यातील ७७ वर्षीय पुरुष, जवळगाव जिल्ह्यातील ५२ वर्षीय महिला कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण :
व्यंकटेश कॉलनी १, रॉक्सी सिनेमा गृहाजवळ १, संगीता कॉलनी १, एन वन, सिडको ३, एन सहा, सिंहगड कॉलनी २, कांचनवाडी १, एन सात सिडको १, कैलासनगर १, एन तीन सिडको १, एन चार सिडको २, भगवती कॉलनी १, एमजीएम परिसर १, बीड बायपास १, एन नऊ, हडको पवननगर १, भावसिंगपुरा २, मिश्रा कॉलनी १, स्टेपिंग स्टोन शाळा परिसर १, सूतगिरणी चौक १, दिल्ली गेट ३, तोरण गडनगर १, बन्सीलालनगर १, ग्लोरिया सिटी पडेगाव १, जीडीसी हॉस्टेल परिसर १, आकाशवाणी परिसर १, शेंद्रा, एमआयडीसी १, नक्षत्रवाडी १, अन्य १६.

ग्रामीण भागातील रुग्ण : बायपास रोड, सिल्लोड १, वाळूज महानगर १, वरुड बु. १, अन्य ८

Web Title: coronavirus : 1205 deaths of corona in Aurangabad district so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.