coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा १०५ वा बळी; चार बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 16:40 IST2020-06-08T16:38:45+5:302020-06-08T16:40:28+5:30

चार बाधितांची वाढ झाल्याने एकूण रुग्णसंख्या २०६९ वर गेली आहे. 

coronavirus: 105th victim of coronavirus in Aurangabad; An increase of four corona patients | coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा १०५ वा बळी; चार बाधितांची वाढ

coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा १०५ वा बळी; चार बाधितांची वाढ

औरंगाबाद : शहरातील बायजीपुरा येथील ६३ वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचा उपचारादरम्यान सोमवारी (दि. ८ ) सकाळी मृत्यू झाला. यामुळे शहरात आतापर्यंतच्या कोरोनाबळींची संख्या १०५ झाली आहे. तर दुपारी चार बाधितांची वाढ झाल्याने एकूण रुग्णसंख्या २०६९ वर गेली आहे. 

बायजीपुरा येथील ६३ वर्षीय वृद्धाला खाजगी रुग्णालयात ४ जून रोजी भरती करण्यात आले होते. कोरोनामुळे न्युमोनिया आणि अनके अवयव निकामी झाल्याने त्यांचा सोमवारी सकाळी आठ वाजता मृत्यू झाला. अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. हा जिल्ह्यातील १०५ वा मृत्यू ठरला आहे.
चार रुग्णांची वाढ

दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी सकाळी ४५ बाधित आढळून आल्यानंतर दुपारी ४ बाधितांची वाढ झाल्याने एकूण रुग्णसंख्या २०६९ झाली आहे. मिल कॉर्नर -१ तर पंढरपूर परिसरात ३ रुग्ण आढळून आले आहेत. यात एक महिला आणि तीन पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
 

Web Title: coronavirus: 105th victim of coronavirus in Aurangabad; An increase of four corona patients