शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

corona virus : तज्ज्ञांचे मत : तापमान वाढले तर कोरोनाचा प्रभाव घटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 6:50 PM

नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांची खबरदारी घेणे गरजेचे

औरंगाबाद : जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणू २८ ते ३० डिग्रीपर्यंतच्या तापमानातच जिवंत राहू शकतो. हा विषाणू कपड्यांवर ९ तास, तर लोखंडी पृष्ठभागावर १२ तास जगू शकतो. औरंगाबादेत उन्हाळ्यात एप्रिलमध्ये तापामानाचा पारा ४३ अंशांवर जातो. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेने कोरोनाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

शहरात वातावरणातील नागरिकांना ताप, सर्दी, खोकल्यासह नाक बंद होणे, डोकेदुखी, ऐकू न येणे, तसेच घसादुखीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून खबरदारी घेतली जात आहे. शहरात गतवर्षी एप्रिलमध्ये ६१ वर्षांनंतर उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती.  कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात कोरोनाची भीती दूर होईल. आगामी काही दिवस ढगाळ वातावरण राहील. मात्र, उच्च तापमान, कोरडे वातावरण या विषाणूसाठी मारक ठरेल, असे तज्जांचे मत आहे.

तापमानाचा परिणाम होईलकोरोनासंदर्भात आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. तापमान वाढल्यानंतर या विषाणूचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे; परंतु एकमेकांपासून तो पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेतली पाहिजे.- डॉ. जी. एम. गायकवाड, सहायक संचालक, आरोग्यसेवा

एप्रिलमध्ये गायबसामाजिक बांधिलकी म्हणून विमानतळावर आमच्याकडून प्रवाशांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी आम्ही डॉक्टर, तर मनपाने यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. ताप अधिक असलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे; परंतु हा विषाणू एप्रिलमध्ये गायब होईल. त्यामुळे चिंतेचे कारण नाही.    - डॉ. उन्मेष टाकळकर

प्रमाण कमी राहीलकोरोनाचा विषाणू कपड्यावर ९ तास जिवंत राहू शकत असल्याचे सांगितले जाते. उन्हाळ्यात कोरोनाचे प्रमाण कमी होईल, अशीच शक्यता आहे. प्रतिबंधात्मक काळजी घेणे केव्हाही चांगले. स्वच्छतेवर अधिक भर द्यावा.- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसिन, घाटी

३८ वर जाणार तापमानऔरंगाबादचे तापमान मार्चअखेरपर्यंत ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.  दुपारी  तापमान अधिक असेल. पावसाळा दीड महिना लांबल्याने हिवाळाही लांबला आहे. त्यामुळे सकाळी  व सायंकाळी थंडी  काही दिवस राहील. गेल्या दोन दिवसांपासून धुकेही आहे.- किरणकुमार जोहरे, हवामानतज्ज्ञ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर