शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

अहो, कोरोना अद्याप गेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 17:13 IST

Corona Virus : पहिल्या अनलाॅकमध्ये केलेल्या चुकांमुळे दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेसह सर्वांचीच तारांबळ उडाली.

ठळक मुद्दे निर्बंध शिथिल झाले तरी सभा, समारंभ, लग्न, अंत्यविधीतील गर्दी टाळा मला काही होत नाही, ही वृत्ती सोडून कोणतेही लक्षणे दिसताच उपचार घ्या

- योगेश पायघन औरंगाबाद : कोरोना अद्याप गेलेला नाही. पुढील किमान पाच ते सहा महिने तरी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. पहिल्या अनलाॅकनंतर केलेल्या त्या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल झाले तरी सभा, समारंभ, लग्न, अंत्यविधीतील गर्दी टाळा, लसीकरणाला प्राथमिकता द्या, कोरोनाची त्रिसूत्री पाळा, मला काही होत नाही, ही वृत्ती सोडून कोणतेही लक्षणे दिसले तर दुखणे अंगावर न काढता उपचार घ्या, आता काही होत नाही म्हणून सुपरस्प्रेडर बनू नका, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी केले.

कोरोना बाधितांचे आकडे हळूहळू कमी होऊन बाधितांसह सक्रिय रुग्णांची संख्या जिल्ह्यात ३ हजाराच्या जवळ आली आहे. १ जूनपासून निर्बंधही शिथिल व्हायला सुरुवात झाली. मात्र, पहिल्या अनलाॅकमध्ये केलेल्या चुकांमुळे दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेसह सर्वांचीच तारांबळ उडाली. इतके संक्रमण जिल्ह्यात वाढले होते. त्यामुळे तिसऱ्या लाटेकडे मार्गक्रमण होऊ नये. ती लाट थोपवताना पहिल्या लाटेतून दुसऱ्या लाटेकडच्या प्रवासातून धडा घेण्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. प्रत्येकाने कोरोनाचे संक्रमण स्वत:ला, कुटुंबाला, शेजाऱ्यांना, परिसरात, गावात होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात आहे.

या पाच चुका पुन्हा करू नका!१-सण, सभा, समारंभ, धार्मिक कार्यक्रम, लग्न, अंत्यविधी, आंदोलनांत गर्दी.२-कोरोनापासून बचावासाठी मास्क, सुरक्षित अंतर, वेळोवेळी हात धुणे या त्रिसूत्रीकडे दुर्लक्ष.३-लक्षणे दिसल्यावर कोरोनाच्या तपासणीला टाळाटाळ, मला काही होत नाही म्हणत अंगावर दुखणे काढले, ते सुपरस्प्रेडर बनले.४-कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यावरही मास्क टाळला. सर्दी, ताप, खोकल्यावर घरगुती उपाय करून लक्षणे लपवली.५-अनलाॅकनंतर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला, बाजारपेठा, हाॅटेल्स, पर्यटनात त्रिसूत्री दुर्लक्षित करून बिनधास्त वावर.

पथकांची असेल नजर-३० माजी सैनिकांचे नागरी मित्र पथक नागरिक कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, निर्बंध, नियमांचे सामान्य नागरिकांना अंमलबजावणी करण्याकडे लक्ष ठेवून दंडात्मक कारवाई करते.-व्यापारी पेठा, बाजारपेठा, आस्थापना घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन कसे करते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मनपाने दहा पथकांची स्थापना केलेले आहे.- अन्न औषध प्रशासक, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी यांचेही एक फिरते पथक जिल्ह्यात उपयायोजनांची अंमलबजावणी होते का काय याकडे लक्ष ठेवून असते.- ग्रामीण भागात ग्रामदक्षता समित्या, तालुका समन्वय अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांची पथके वेळोवेळी दौऱ्यात नियम, निर्बंधांचे पालन होते का याची खातरजमा करून आवश्यक तेथे दंडात्मक कार्यवाही करतात.- शहरासह जिल्ह्यात पोलीस दलाकडूनही ठिकठिकाणी नाकाबंदी, नागरिकांना पोलीस वाहनांवरून आवाहन करून कोरोनाचे नियम पाळण्यासंबंधी आवाहन करण्यात येते.

पहिला अनलाॅक : ४ ऑगस्ट २०२०एकूण कोरोना रुग्ण -१५,१५०बरे झालेले रुग्ण -११,३६८मृत्यू -४९३

दुसरा अनलाॅक : १ जून २०२१एकूण कोरोना रुग्ण -१,४२,८८९बरे झालेले रुग्ण - १,३६,४६३मृत्यू -३,२१४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCorona vaccineकोरोनाची लस