शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'आधी अ‍ॅडव्हान्स भरा, मगच उपचार'; रुग्ण दाखल झाल्यानंतर २४ तासात भरावी लागते रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 12:21 IST

corona virus in Aurangabad दररोज दीड हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांत भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्दे ८० टक्के खाटा खासगी रुग्णालयांत शासकीय दरानुसार२० टक्के खाटा खासगी दरानुसार देणे बंधनकारक आहे.शासनाने आकारण्यात येणारे दरही निश्चित केले आहेत.

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शासकीय रुग्णालयांबरोबर खासगी रुग्णालये रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. अनेक खासगी रुग्णालये रुग्ण दाखल होताच रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यास प्राधान्य देतात. परंतु काही खासगी रुग्णालये पैसे भरल्याशिवाय रुग्णास भरती करून घेत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच बहुतांश रुग्णालयांत २४ तासात डिपाॅझिटची रक्कम भरण्यास सांगितली जाते. त्यामुळे नातेवाईकांना पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव करावी लागते.

खासगी रुग्णालयांत ८० टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी ठेवण्याची सूचना शासनाने केली आहे. त्यासाठी आकारण्यात येणारे दरही निश्चित केले आहेत. उर्वरित २० टक्के खाटा अन्य रुग्णांसाठी आणि जे कोरोना रुग्ण खासगी सुविधा घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजारांवर गेली आहे. दररोज दीड हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांत भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशावेळी आयसीयु बेड नाही, व्हेंटिलेटर नाही यासह दाखल करून घेण्याआधीच आणि उपचार सुरू करण्याआधीच अनेक रुग्णालये पैसे भरण्यास सांगत असल्याची ओरड होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

शासकीय दर कठीणचखासगी रुग्णालयांत आयसोलेशन वॉर्डसाठी रोज ४ हजार रुपये, आयसोलेशन आयसीयु विदाऊट व्हेंटिलेटरसाठी रोज ७ हजार ५०० आणि आयसोलेशन आयसीयु विथ व्हेंटिलेटरसाठी रोज ९ हजार रुपये शुल्क आहे. त्याशिवाय महागडी औषधी, तपासण्या, पीपीई कीटचा खर्च वेगळा आहे. ८० टक्के खाटांसाठी हा दर असल्याचे सांगण्यात आले.

रुग्ण आल्यानंतर आधी उपचारऔषधे ही रुग्णालयाची नसतात. अशा गोष्टींसाठी डिपाॅझिट घ्यावे लागते. परंतु डिपाझिट भरले नाही तर अ‍ॅडमिशन दिले जाणार नाही, असा प्रकार कोणत्याही रुग्णालयात होत नाही. त्यासाठी २४ तासांची वेळ दिली जाते. रुग्ण आल्यानंतर आधी उपचार करून रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यास प्राधान्य दिले जाते. अनेकांकडे विमा असतो, विम्याची मंजुरी येईपर्यंत तोपर्यंतच्या खर्चासाठी रक्कम घ्यावी लागते.- डॉ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष, मराठवाडा हाॅस्पिटल असाेसिएशन

खासगी रुग्णालयांचे दर डोळे पांढरे करणारेज्यांना वाॅर्डात राहायचे नसते, स्वतंत्र रूममध्ये थांबायचे असते, अशा रुग्णांसाठी वेगळे दर आकारण्यात येत आहेत. स्वतंत्र कक्षात ऑक्सिजन बेडसाठी ५ हजार ५०० ते ६ हजार ५०० रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येते, तर दोन रुग्णांच्या शेअरिंग रूमसाठी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये मोजावे लागतात.

विमा असूनही रोखसाठी त्रासएका खासगी रुग्णालयात नातेवाईकाला भरती केले. विमा होता. त्यामुळे कॅशलेस उपचार मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु रुग्णालयाने पैसे भरण्यास सांगितले. त्यामुळे ऐनवेळी पैसे जमा करावे लागले. कॅशलेस उपचार म्हटले, तर खऱ्याअर्थाने कॅशलेस उपचार मिळाले पाहिजेत. त्यात सुधारणा होण्यासाठी रुग्णालयांनीही पुढाकार घेतला पाहिजे, असे एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या