corona virus in Aurangabad : जिल्ह्यात सक्रिय रुग्णांत घट; १३७३ रुग्णांना सुटी, १०६१ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 11:28 IST2021-04-30T11:26:13+5:302021-04-30T11:28:28+5:30

corona virus in Aurangabad : जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २२ हजार ९४१ एवढी झाली आहे. तर आतापर्यंत एक लाख ८ हजार ५२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

corona virus in Aurangabad: decrease in active corona patients in the district; Holidays for 1373 patients, increase of 1061 patients | corona virus in Aurangabad : जिल्ह्यात सक्रिय रुग्णांत घट; १३७३ रुग्णांना सुटी, १०६१ रुग्णांची वाढ

corona virus in Aurangabad : जिल्ह्यात सक्रिय रुग्णांत घट; १३७३ रुग्णांना सुटी, १०६१ रुग्णांची वाढ

ठळक मुद्दे दिवसभरात उपचारादरम्यान २७ रुग्णांचा मृत्यू  सध्या जिल्ह्यात ११,९३३ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १०६१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,३७३ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत २७ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २० आणि अन्य जिल्ह्यांतील ७ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांत घट होत असून, सध्या ११,९३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २२ हजार ९४१ एवढी झाली आहे. तर आतापर्यंत एक लाख ८ हजार ५२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २,४८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १०६१ नव्या रुग्णांत शहरातील ४५६, तर ग्रामीण भागामधील ६०५ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ७०२ आणि ग्रामीण भागातील ६७१ अशा १,३७३ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना रांजणगाव शेणपुंजी येथील ४५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ५५ वर्षीय महिला, सिडको महानगर, वाळूज येथील ६५ वर्षीय महिला, जावेडा, खुरडा येथील ६५ वर्षीय पुरुष, विशालनगर, गारखेडा येथील ८५ वर्षीय महिला, चिंचोली, लिंबाजी, कन्नड येथील ४५ वर्षीय महिला, गोलटगाव येथील ५५ वर्षीय महिला, सातारा परिसरातील ६२ वर्षीय पुरुष, जोगेश्वरी येथील ६९ वर्षीय महिला, कबाडीपुरा येथील ७१ वर्षीय पुरुष, आठेगाव, कन्नड येथील ६० वर्षीय पुरुष, मिल कॉर्नर येथील ७० वर्षीय महिला, नूतन कॉलनीतील ६८ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ६० वर्षीय महिला, खाराकुंवा येथील ९३ वर्षीय पुरुष, रामचंद्रनगर येथील ५० वर्षीय पुरुष, भारतनगर येथील ५८ वर्षीय पुरुष, वारेगाव, फुलंब्रीतील ७५ वर्षीय महिला, एन-५ येथील ७८ वर्षीय महिला, अंभई, सिल्लोड येथील ५५ वर्षीय पुरुष आणि बुलडाणा जिल्ह्यातील ६५ वर्षीय पुरुष, ५१ वर्षीय महिला, अहमदनगर जिल्ह्यातील ५२ वर्षीय पुरुष, ८२ वर्षीय पुरुष, ४१ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिला, ८२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी परिसर १, भावसिंगपुरा १, पडेगाव १, उस्मानपुरा १, साई नगर १, बीड बायपास ५, सातारा परिसर ५, देवळाली २, लक्ष्मी कॉलनी १, शीतलनगर १, दर्शन विहार १, सोनियानगर ३, हर्सुल ११, एन-१ येथे ३, एन-६ येथे ४, एन-७ येथे ६, एन-८ येथे ५, एन-९ येथे ३, एन-११ येथे ८, एन-१२ येथे ३, एन-५ येथे २, एन-४ येथे १, मयूर पार्क ८, जाधववाडी ७, सारावैभव जटवडा रोड १, पुडंलिकनगर २, न्यू हनुमाननगर २, आनंद नगर ३, आदित्यनगर २, गुलमोहर कॉलनी २, बालाजीनगर १, अल्का सोसायटी १, अलंकार सोसायटी १, गारखेडा ५, भानुदासनगर १, देशमुखनगर १, रेणुकानगर ३, सिंधी कॉलनी १, विशालनगर ४, जय विश्वभारती कॉलनी १, आलमगिर कॉलनी १, अल्तमश कॉलनी बायजीपुरा १, म्हसाेबा नगर ४, साई मेडिसिटी हॉस्पिटल १, छत्रपती नगर १, एस.आर.पी.एफ. कॅम्प ३, केम्ब्रिज शाळेजवळ अभिजित हॉटेल १, देवानगरी १, जय मल्हारनगर ३, कासलीवाल गार्डन मुकुंदवाडी २, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन ३, राजीव गांधीनगर ३, विमानतळजवळ १, न्यू गणेशनगर १, ब्ल्यू बेल हाउसिंग सोसायटी एम.आय.डी.सी. १, कासलीवाल पूर्व १, जय भवानी नगर १, पीयूष विहार, अयोध्यानगर १, मनाली रेसिडेंन्सी सिडको १, राजनगर गादिया विहार १, दर्गा परिसर १, सुधाकरनगर १, आकाशवाणी १, देवळाई परिसर १, संजयनगर १, शिवाजीनगर ३, संग्रामनगरजवळ रेणुका माता परिसर २, हाय कोर्ट कॉलनी १, केशवनगर २, गजानननगर २, मयूर बन कॉलनी १, जय भवानीनगर ६, श्रेयनगर १, देवानगरी १, शंभुनगर १, उल्कानगर ४, विश्व भारती कॉलनी १, शिवशंकर कॉलनी १, मिसारवाडी १, बुढ्ढीलाइन १, मिल कॉर्नर १, मोहनलाल नगर १, न्यू कुतुबपुरा १, टी.व्ही सेंटर १, टाऊन हॉल १, संघर्षनगर १, देशमुखनगर १, करोल १, म्हाडा कॉलनी २, विठ्ठलनगर २, देवगिरी कॉलनी १, विश्रांती नगर २, उत्तारनगरी १, रामनगर १, दूध डेअरी १, नायकनगर १, खडकेश्वर १, अन्य २५६

ग्रामीण भागातील रुग्ण
चिकलठाणा ६, वैजापूर २, उपळी १, निमगाव १, फुलंब्री १, जामखेड १, पिसादेवी २, मस्नतपूर १, कन्नड १, सिल्लोड १, आपतगाव २, लाडगाव शेंद्रा एम.आय.डी.सी. २, शिरेगाव लासूर स्टेशन १, अंधारी १, माळीवाड ३, साई मंदिर बजाजनगर १०, साजापूर १, गणेशनगर रामगिरी रोड वाळूंज २, वडगाव २, सिडको महानगर ३, फुलशिवरा गंगापूर १, नक्षत्रवाडी ३, कांचनवाडी १, झाल्टा १, पैठण १, अन्य ५०४

Web Title: corona virus in Aurangabad: decrease in active corona patients in the district; Holidays for 1373 patients, increase of 1061 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.