corona virus in Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यात १,४९३ कोरोनाबाधितांची भर, २४ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 12:53 IST2021-04-20T12:51:37+5:302021-04-20T12:53:57+5:30
corona virus in Aurangabad : आतापर्यंत १ लाख १० हजार ४९३ जणांना जिल्ह्यात कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ९२ हजार ६८३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

corona virus in Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यात १,४९३ कोरोनाबाधितांची भर, २४ मृत्यू
औरंगाबाद : जिल्ह्यात १४९३ कोरोनाबाधितांची सोमवारी भर पडली, तर २४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १,५७८ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात मनपा हद्दीतील ९०० तर ग्रामीण ६७८ जणांचा समावेश आहे.
आतापर्यंत १ लाख १० हजार ४९३ जणांना जिल्ह्यात कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ९२ हजार ६८३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आजपर्यंत २,१८० कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १५,६३० रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शहरातील ५२६ रुग्ण
सिडको ४, पडेगाव २, बुद्धनगर १, हर्सूल ५, अन्य १०, ज्योतीनगर १, गारखेडा परिसर २, मिसारवाडी १, रेल्वे स्टेशन १, कांचनवाडी ६, नागेश्वरवाडी १, मीरानगर १, एन-६ सिडको ८, जाधववाडी १, मिलकॉर्नर २, राजाबाजार ३, श्रीनिकेतन कॉलनी १, भवानीनगर मोढा १, मनीषा कॉलनी २, जालाननगर १, पद्मपुरा १, समर्थनगर २, बेगमपुरा १, मुडणे पसोली १, म्हाडा कॉलनी १, गांधीनगर १, औरंगपुरा १, नाथनगर २, त्रिमूर्ती चौक १, मुकुंदवाडी १, पैठणरोड परिसर १, देवळाई चौक ७, गजानननगर ६, भानुदासनगर १, भारतनगर १, शिवनेरी कॉलनी १, विश्वभारती कॉलनी २, बीडबाय पास ८, शिवाजीनगर २, पुंडलिकनगर १, सिंधी कॉलनी १, झांबड इस्टेट १, उल्कानगरी १, नवनाथ नगर ३, रमेशनगर १, जयभवानीनगर ४, विजयनगर १, स्वप्ननगरी १, एन-११ येथील हडको ५, एन-४ येथील सिडको ५, रहनुमिया कॉलनी १, मयूर पार्क ३, एन-१२ येथील १, सुरेवाडी १, एन-२ सिडको २, सातारा परिसर ७, ठाकरेनगर ४, एसटी कॉलनी १, म्हाडा कॉलनी ३, उत्तरानगरी १, श्रध्दा कॉलनी ३, मुकुंदनगर १, धुत हॉस्पीटल परिसर १, हनुमाननगर १, अंबिकानगर १, विश्रांतीनगर १, संजयनगर १, देवा नगरी ३, तुळाईनगर ३, सुधाकरनगर १, पेशवेनगर १, विनोस सिटी १, चाणक्यनगर १, शिल्पनगर १, माहुनगर १, रेणुकानगर १, नंदनवन कॉलनी १, भावसिंगपुरा १, एन-२ सिडको १, भाग्यनगर १, होनाजीनगर २, सारा वैभव ३, जाधववाडी १, एन-१३ येथील २, टिळकनगर १, आदित्यनगर १, ऑडिटर सोसायटी १, संगवी १, एन-५ सिडको २, एन-७ येथे २, एन-८ येथे ६, चिकलठाणा १, व्यंकटेश कॉलनी १, शाहनगर १, सृष्टी हॉस्पिटल १, मिल कॉर्नर द्वारकापुरी १, नंदनवन कॉलनी १, अन्य ३२५
ग्रामीण भागातील ९६७ रुग्ण
औरंगाबाद तालुका १५३, फुलंब्री तालुका ५०, गंगापूर १२३, कन्नड १३७, खुलताबाद १७, सिल्लोड ६७, वैजापूर २१०, पैठण १७३, सोयगांव ३७ बाधित रुग्ण आढळून आले.
२४ कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात ५५ वर्षीय महिला, सिल्लोड, ६५ वर्षीय महिला बोरसर, वैजापूर, ६१ वर्षीय पुरुष वाळुज, ८५ वर्षीय पुरुष वैजापूर, ५९ वर्षीय महिला आमखेडा, सोयगांव, ७० वर्षीय महिला रेल्वे स्टेशन, ५२ वर्षीय महिला नंदनवन काॅलनी, ६९ वर्षीय पुरुष शितेगांव, ६५ वर्षीय पुरुष अयोध्यानगर, २१ वर्षीय पुरुष आरतीनगर, पिसादेवी रोड, ५० वर्षीय महिला जयभवानीनगर, ४० वर्षीय पुरुष भगुर वैजापूर, ५८ वर्षीय पुरुष राधास्वामी काॅलनी, ७० वर्षीय महिला गाजीवाडा पैठण, ४२ वर्षीय महिला बोरसर, ५५ वर्षीय महिला एन २ सिडको, ७५ वर्षीय महिला एन ११ हडको, ७३ वर्षीय महिला गारखेडा, ६० वर्षीय पुरुष गंगापूर, जिल्हा सामान्य रुग्णालयात ३७ वर्षीय पुरुष, एमआयडीसी वाळूज, गंगापूर, ५२ वर्षीय पुरुष, खंडाळा, वैजापूर, ६९ वर्षीय महिला शानोशौकत कॉलनी, औरंगाबाद, तर खासगी रुग्णालयात ६८ वर्षीय पुरुष, एमआयडीसी वाळूज, गंगापूर, ७५ वर्षीय पुरुष, जटवाडा रोड, हर्सूल, औरंगाबाद यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.