CoronaVirus In Aurangabad : शहरातील ५, ग्रामीण भागांतील १७ रुग्णांचा मृत्यू; रविवारी ७५९ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 12:18 IST2021-05-10T12:16:44+5:302021-05-10T12:18:25+5:30
CoronaVirus In Aurangabad :जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ३२ हजार ३६९ झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख २१ हजार ५४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

CoronaVirus In Aurangabad : शहरातील ५, ग्रामीण भागांतील १७ रुग्णांचा मृत्यू; रविवारी ७५९ रुग्णांची वाढ
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ७५९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,३०४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. जिल्ह्यात ग्रामीण भागांत रुग्णसंख्या वाढतच असून, मृत्यूचाही कहर सुरू आहे. गेल्या २४ तासांत शहरातील ५, ग्रामीण भागातील १७ आणि अन्य जिल्ह्यांतील १० रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ८,०७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ३२ हजार ३६९ झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख २१ हजार ५४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,७५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांत शहरातील २७७, तर ग्रामीण भागातील ४८२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४८४ आणि ग्रामीण भागातील ८२० अशा १,३०४ रुग्णांना सुटी देण्यात आली.
उपचार सुरु असताना सिल्लोड येथील ५० वर्षीय महिला, नक्षत्रवाडीतील ७७ वर्षीय पुरुष, वैजापूर ६० वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ५५ वर्षीय पुरुष, खोपरखेडा येथील ५० वर्षीय पुरुष, कन्नड येथील ५० वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ४५ वर्षीय पुरुष, एन-१२ येथील ७२ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ४७ वर्षीय पुरुष, पैठण रोड येथील ४५ वर्षीय महिला, वैजापूर येथील ६० वर्षीय महिला, वाळूज येथील ३५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ५० वर्षीय महिला, पैठण येथील ५५ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ६५ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ७३ वर्षीय महिला, भावसिंगपुरा येथील ५७ वर्षीय पुरुष, शिरोडी, फुलंब्री येथील ६५ वर्षीय महिला, जातेगाव, फुलंब्री येथील ४० वर्षीय महिला, रांजणगाव, पैठण येथील ४५ वर्षीय महिला, खोकडपुरा येथील ५३ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ७२ वर्षीय महिला, ६० वर्षीय महिला, ४७ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय पुरुष , ५७ वर्षीय महिला, बीड येथील ५४ वर्षीय महिला, हिंगोलीतील २७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी परिसर १, देवळाई २, देवळाई चौक ४, सिडको २, पेशवेनगर २, मुंकदवाडी ५, सातारा परिसर २, बीड बायपास २, औरंगाबाद परिसर १, मिलिंदनगर १, आस्था घर फाऊंडेशन १, सहयोगनगर १, हनुमाननगर ३, विशालनगर १, अंगुरीबाग १, तोरणागडनगर १, विठ्ठलनगर १, संजयनगर १, डी. के. एम. एम. हॉस्पिटल २, खडकेश्वर १, स्वराज्यनगर १, जयभवानीनगर १, वानखेडेनगर ३, शिवनगर १, जुना मोंढा ३, जाधववाडी १, रशिदपुरा १, मिलकॉर्नर २, टाऊन हॉल १, विद्यानगर २, न्यू एस. टी. कॉलनी १, कासलीवाल रेसिडेन्सी, प्रतापनगर १, हर्सूल ४, एकतानगर १, जाधववाडी ३, मयुर पार्क ५, जहांगीर कॉलनी १, पवननगर १, सुदर्शननगर १, घृष्णेश्वर कॉलनी २, हिंदुस्तान आवास १, गजानननगर १, चिकलठाणा १, बारी कॉलनी १, लक्ष्मी कॉलनी १, नंदनवन कॉलनी १, कालिकामाता हौ. सोसायटी १, संजयनगर १, एन-४ येथे ३, एन-७ येथे २, एन-११ येथे १, एन-१ येथे १,एन-७ येथे ३, एन-६ येथे ३, एन-८ येथे १, एन-१२ येथे १, एन-२ येथे १, अन्य १८२.
ग्रामीण भागातील रुग्ण
पैठन १, प्रिंपी, ता. फुलंब्री १, पिसादेवी ३, लिहाखेडी, ता. सिल्लोड १, पांगरा १, नक्षत्रवाडी २, चित्तेगाव १, गंगापूर १, दत्तानगर, रांजणगाव २, वाळुज, अविनाश कॉलनी १, बजाजनगर ८, लिंबे जळगाव २, नारेगाव १, बोधेगाव १, आसेगाव, ता. गंगापूर १, वडगाव कोल्हाटी ३, बकवालनगर १, सिडको महानगर ४, अंबेलोहळ, ता. गंगापूर १, मेंहदीपुरा, ता. गंगापूर १, अन्य ४४५.