Corona Virus : कोरोनाचे शहरात ६८ तर ‘ग्रामीण’मध्ये ७७ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 11:42 IST2021-06-09T11:40:59+5:302021-06-09T11:42:18+5:30
Corona Virus: सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या २,१६० रुग्णांवर सुरू उपचार आहेत

Corona Virus : कोरोनाचे शहरात ६८ तर ‘ग्रामीण’मध्ये ७७ नवे रुग्ण
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १४५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ६८, तर ग्रामीण भागातील ७७ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना मृत्यूची संख्या एकेरी आकड्यात आली असून, गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २ हजार १६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४४ हजार ९१ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३८ हजार ६३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १५१ आणि ग्रामीण भागातील ७१, अशा २२२ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना पवननगर, एन-९ येथील ३८ वर्षीय महिला, बेगमपुरा येथील ५४ वर्षीय पुरुष, वडवळी, पैठण येथील ५५ वर्षीय महिला, एकतुनी येथील ३५ वर्षीय पुरुष, नक्षत्रवाडी, पैठणरोड येथील ६० वर्षीय पुरुष, एन-१ येथील ६९ वर्षीय पुरुष, गुलमंडी येथील ७० वर्षीय महिला, पैठण येथील ७५ वर्षीय पुरुष, वाळूज येथील ५२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद ३, सातारा परिसर २, शिवाजीनगर ३, गारखेडा ४, बीड बायपास १, क्रांतीनगर १, नंदनवन कॉलनी १, निओ सिटी १, क्रांती चौक १, सुंदरनगर, पडेगाव १, देवळाई १, एन-७ येथे १, रोशन गेट १, चिकलठाणा १, न्यू एस. टी. कॉलनी १, रामनगर १, जयभवानीनगर २, मुकुंदवाडी १, हर्सूल २, मुकुंदनगर १, एन-५ येथे १, पुंडलिकनगर १, पडेगाव १, भवानीनगर १, मयूर पार्क २, पिसादेवी रोड, हर्सूल १, घाटी हॉस्टेल १, घाटी मुलींचे वसतिगृह २, एन-९ येथे १, अंगुरीबाग १, माऊलीनगर १, म्हाडा कॉलनी १, सुधाकरनगर १, पहाडसिंगपुरा १६, विष्णूनगर १, शहानूरवाडी १, एन-६ येथे १, अन्य ४.
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर १, सिडको वाळूज महानगर-१ येथे २, रांजणगाव शेणपूंजी १, कडेठाण ता.पैठण १, औराली, ता. औरंगाबाद १, शिवपूर, ता. गंगापूर १, वडगाव कोल्हाटी ३, बोधेगाव, ता. फुलंब्री १, पानरांजणगाव खुरी २, साकेगाव १, लिंडेगाव, ता. पैठण १, अन्य ६२.