corona virus : औरंगाबादेत बुधवारी कोरोनाने १७ वर्षीय मुलासह ४२ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 12:08 IST2021-04-22T12:06:47+5:302021-04-22T12:08:14+5:30

corona virus in aurangabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख १३ हजार ३७ झाली आहे, तर आतापर्यंत ९५ हजार ७६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

Corona virus: 42 patients, including a 17-year-old boy, died of corona virus in Aurangabad on Wednesday | corona virus : औरंगाबादेत बुधवारी कोरोनाने १७ वर्षीय मुलासह ४२ रुग्णांचा मृत्यू

corona virus : औरंगाबादेत बुधवारी कोरोनाने १७ वर्षीय मुलासह ४२ रुग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देबुधवारी दिवसभरात जिल्ह्यात १,२०७ रुग्णांची वाढ सध्या जिल्ह्यात १५,०२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १,२०७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ५८४, तर ग्रामीण भागातील ६२३ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत १७ वर्षीय मुलासह ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ३४ आणि अन्य जिल्ह्यांतील ८ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या १५,०२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख १३ हजार ३७ झाली आहे, तर आतापर्यंत ९५ हजार ७६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,२५१ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ७०० आणि ग्रामीण भागातील ५४२ अशा १,२४२ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. आनंदनगर येथील १७ वर्षीय मुलाला १५ एप्रिल रोजी उपचारासाठी घाटीत दाखल केले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी त्याने अखेरचा श्वास घेतला. ‘बायलॅटरल न्यूमाेनिया विथ एक्यूट रेस्पिरेटरी डिसट्रेस सिंड्राेम विथ सायटाेकाईन स्ट्राॅम विथ काेएगुलाेपथी इन केस ऑफ सेरेब्रल पाल्सी’ असे मृत्यूचे कारण नमूद आहे. त्याबरोबरच उपचार सुरू असताना पिशोर (ता. कन्नड) येथील ६० वर्षीय पुरुष, येवला रोड, वैजापूर येथील ७५ वर्षीय पुरुष, काबरानगर, गारखेडा येथील ३८ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६४ वर्षीय महिला, मुकुंदवाडीतील ६० वर्षीय महिला, सोयगावातील ५५ वर्षीय पुरुष, रोटेगाव, (ता. वैजापूर) येथील ७५ वर्षीय पुरुष, फुलेनगर, हर्सूल येथील ६८ वर्षीय महिला, डिगाव (ता. सिल्लोड) येथील ३८ वर्षीय महिला, बजाजनगरातील ४२ वर्षीय महिला, मकरनपूर (ता. कन्नड) येथील ५० वर्षीय पुरुष, भीवगाव (ता. वैजापूर) येथील ४५ वर्षीय पुरुष, नरहरी रांजणगाव (ता. पैठण) येथील ६६ वर्षीय महिला, डोणगाव टेकडी तांडा (ता. पैठण) येथील ३४ वर्षीय पुरुष, पिंपळवाडी (ता. पैठण) येथील ४२ वर्षीय पुरुष, धावनी मोहल्ला येथील ८२ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडी, राजनगर येथील ४९ वर्षीय पुरुष, फारोळा (ता. पैठण) येथील ५१ वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथील ४५ वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर येथील ५० वर्षीय महिला, पैठण राेड येथील ८० वर्षीय पुरुष, मिलिंदनगर, एन-५ येथील ६६ वर्षीय पुरुष, कांचनवाडी येथील ६२ वर्षीय महिला, मारुतीनगर, मयूर पार्क येथील ५१ वर्षीय पुरुष, एन-२ येथील ८० वर्षीय महिला, बन्सीलालनगरातील ६ वर्षीय पुरुष, गजानननगरातील ६७ वर्षीय पुरुष, केकतजळगाव (ता. पैठण) येथील ८१ वर्षीय पुरुष, नोदलगाव (ता. पैठण) येथील ६५ वर्षीय पुरुष, सराफा, सिल्लोड येथील ८० वर्षीय पुरुष , चारठा येथील ५० वर्षीय महिला, शिवगड तांडा, आडगाव बुद्रुक येथील ५९ वर्षीय पुरुष, नाचनवेल, कन्नड येथील ७० वर्षीय पुरुष आणि बुलडाणा येथील ५२ वर्षीय पुरुष , धोपटेश्वर, बदनापूर, जालना येथील ५७ वर्षीय महिला, अहमदनगर येथील ७१ वर्षीय पुरुष, पिंपळगाव, तांदुळजा, लातूर येथील ८० वर्षीय पुरुष , जालना येथील ६५ वर्षीय महिला, प्रवरा संगम, नेवासा, अहमदनगर येथील ४० वर्षीय पुरुष, लोणार, जालना जिल्ह्यातील ८५ वर्षीय महिला, बुलडाणा येथील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद ३, एन-१२ येथे ४, भावसिंगपुरा १, हडको एन-११ येथे ७, एन-२ येथे १५, एन-४ येथे २, एन-६ येथे ३, एन-५ येथे ६, एन-८ येथे ६, एन-७ येथे ११, एन-३ येथे २, एन-१ येथे ७, एन-९ येथे २, तोफखाना बाजार १, सिडको कामगार चौक १, दिशा अपार्टमेंट १, पडेगाव १, गणेशनगर १, फळशी प्लॅन १, बीड बायपास ८, श्रद्धाश्रम कॉलनी १, उल्कानगरी ५, देवळाई परिसर ३, उस्मानपुरा ४, बन्सीलालनगर १, देवगिरी व्हॅली १, कांचनवाडी १०, ज्योतीनगर २, म्हाडा कॉलनी १, छावणी १, वेदांतनगर १, आँरेज सिटी १, गुलमंडी १, क्रांतीनगर १, बीड बायपास २, तापडिया ब्लोरा १, हिंदुस्थान आवास २, नाथ व्हॅली १, ठाकरेनगर २, हर्सूल १०, जाधववाडी ५, ज्योतीनगर ३, टी.व्ही. सेंटर २, शिवशंकर कॉलनी २, मयूर पार्क, म्हसोबानगर ५, वाल्मी नाका १, कासलीवाल गारखेडा ५, गारखेडा सूतगिरणी १, गजानननगर ३, शिवाजीनगर ८, गादियाविहार ४, तापडियानगर २, हनुमाननगर ३, नाथनगर १, शाहनूरवाडी २, गुरुप्रसादनगर १, छत्रपतीनगर ३, देवळाई चौक ४, शंभूनगर १, सातारा परिसर १३, हमीद कॉलनी २, धन्वंतरीनगर २, सोनियानगर १, सेनानगर १, एकनाथनगर १, बजाज बॉईज हॉस्टेल १, साईसंकर पार्क १, भीमनगर, पेठेनगर ३, जय भवानीनगर १, सिंहगड कॉलनी १, स्वराजनगर १, मुकुंदवाडी ७, स्वप्ननगरी २, बाळकृष्णनगर १, जवाहर कॉलनी २, गजानन कॉलनी ६, कैलासनगर १, सहारा परिसर १, केशवनगरी १, राजनगर १, हिंदुराष्ट्र चौक १, विजयनगर १, मोहटा देवी १, भानुदासनगर १, विजयनगर १, आदिनाथनगर २, नाईकनगर १, विश्व भारती कॉलनी २, पुंडलिकनगर १, चैतन्यनगर २, आकाशवाणी १, प्रतापनगर २, कोटला कॉलनी १, भाग्यनगर २, राजाबाजार २, विष्णूनगर १, बेस्ट प्राइज १, क्रांतीचौक २, क्रांतीनगर १, सी.पी. ऑफिस १, बाबा पेट्रोल पंप १, पदमपुरा २, म्हाडा कॉलनी ४, पन्नालालनगर १, टाइम्स कॉलनी ३, हिमायत बाग १, जयसिंगपुरा २, पेठेनगर १, गणेश कॉलनी १, जाधववाडी २, शहाबाजार १, पवननगर १, सह्याद्रीनगर १, विठ्ठलनगर २, उत्तरानगरी २, राजनगर १, शिवशाहीनगर १, जिजामाता कॉलनी १, अंबिकानगर १, जयभवानीनगर ५, एअर पोर्ट परिसर ३, चाणक्यपुरी १, सूरजनगर १, नवनाथनगर १, आईसाहेबनगर १, राजे संभाजी कॉलनी १, विवेकानंदनगर २, कार्तिकनगर १, राधेस्वामी कॉलनी २, भगतसिंगनगर ३, एकतानगर २, सुभाषनगर २, सुदर्शननगर १, अशोकनगर १, सिडको टाऊन सेंटर २, ॲपेक्स हॉस्पिटल १, जटवाडा रोड ४, जालननगर १, जिन्सी पोलीस स्टेशन १, भोईवाडा १, अमृत साई प्लाझा १, कासलीवाल मार्वल २, नाथ व्हॅली स्कूल २, रेल्वे स्टेशन १, काबरानगर २, सहकारनगर २, सनी सेंटर न्यू मोंढा १, अन्य २३९                        ‍
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर ४, पंढरपूर १, इटखेडा ७, वैजापूर १, पैठण १, जटवाडा २, साजतपूर २, चित्तेगाव १, चिकलठाणा ५, गिरणेर तांडा १, नक्षत्रवाडी २, ढोरकीन १, डोणगाव १, आकोड १, हर्सूल सावंगी ४, पिसादेवी रोड ४, सोलेगाव १, खुलताबाद १, आसेगाव २, पिसादेवी श्रीनाथनगर १०, बोरगाव सरक १, नारेगाव २, करमाड २, निपाणी आडगाव ३, शिराळ पात्री १, करंजखेड १, डोणवाडा १, गंगापूर १, मिटमिटा २, जोगेश्वरवाडी ३, सिल्लोड २, शेंद्रा १, लासूर स्टेशन १, अन्य ५५१.

Web Title: Corona virus: 42 patients, including a 17-year-old boy, died of corona virus in Aurangabad on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.