शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

कोरोनायोद्ध्यांच्या शिलेदारांनी घेतली कोरोना लस; आरोग्य अधिकाऱ्यांनी लस घेताच वाढले प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 1:16 PM

corona vaccine लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच लसीकरण ७७ टक्क्यांवर गेले.

ठळक मुद्देकोरोना लसीकरण मोहिमेला आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अल्पप्रतिसाद मिळत होता. तीन दिवसाच्या लसीकरणात १५०० पैकी ९२५ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. लसीकरणाच्या चाैथ्या दिवशी दिवसभरात ७७२ जणांना जिल्ह्यात लस देण्यात आली.

औरंगाबाद : रिॲक्शन.. साइड इफेक्ट आणि दुष्परिणामाची भीती ही सगळी स्थिती शुक्रवारी कोरोनायोद्ध्यांच्या शिलेदारांनी म्हणजेच वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीचा डोस स्वतः घेत दूर केली. लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच लसीकरण ७७ टक्क्यांवर गेले.

आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी मुजीब सय्यद, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, मनपा हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. विशाल पट्टेकर, स्रीरोग तज्ज्ञ डाॅ. सुनिला लाळे, डॉ. व्ही. एस. विखे, न्यूरो फिजिशियन डॉ. माजेद यांच्यासह वरिष्ठ डाॅक्टरांनी धूत हाॅस्पिटल येथे लस घेतली. यावेळी डाॅ. हिमांशू गुप्ता यांच्यासह डाॅ.अर्चना राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना लसीकरण मोहिमेला आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अल्पप्रतिसाद मिळत होता. तीन दिवसाच्या लसीकरणात १५०० पैकी ९२५ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. लसीकरणाच्या चाैथ्या दिवशी दिवसभरात ७७२ जणांना जिल्ह्यात लस देण्यात आली. यात धूत हाॅस्पिटल १५४, एमजीएम रुग्णालयात १६०, हेडगेवार रुग्णालयात ७४, कमलनयन बजाज रुग्णालयात ४१, मेडिकव्हर हाॅस्पिटल ४८, घाटीमध्ये ३९ असे शहरात सहा केंद्रांवर सहाशेपैकी ५१६ तर ग्रामीणमध्ये वैजापूर ६७, सिल्लोड ८३, पाचोड ५१, अजिंठा ५५ असे ग्रामीणमध्ये ४०० पैकी २५६ जणांना लस देण्यात आली, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रिॲक्शनची भीती बाळगण्याची गरज नाहीलस घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालयात आलो. सायंकाळपर्यंत नियमित कामकाज केले. राज्यपालांसोबतच्या व्हीसीलाही उपस्थित होतो. काहीही त्रास जाणवला नाही. त्यामुळे रिॲक्शनची कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही, असे मला वाटते. जिल्हा रुग्णालयातील इतर डाॅक्टरांनीही लस घेतली. त्यांनाही कोणताच त्रास झाला नाही.- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक, औरंगाबाद

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद