Corona vaccine : औरंगाबाद जिल्हा न्यायालयात १५३ जणांचे कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 14:21 IST2021-04-24T14:20:51+5:302021-04-24T14:21:50+5:30
शासकीय निर्बंधांमुळे सर्व वकील आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण होऊ शकले नाही.

Corona vaccine : औरंगाबाद जिल्हा न्यायालयात १५३ जणांचे कोरोना लसीकरण
औरंगाबाद : उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरात वकील, न्यायालयातील कार्यालयीन कर्मचारी आणि शिपाई अशा एकूण १५३ जणांचे लसीकरण झाले.
प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीपाद टेकाळे, जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव शिवाजी इंदलकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणी आणि सचिव ॲड. संदीप शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडले. शासकीय निर्बंधांमुळे सर्व वकील आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण आज होऊ शकले नाही. त्यामुळे पुन्हा असे लसीकरण शिबिर घेणार असल्याचे अध्यक्ष ॲड. पाटणी यांनी सांगितले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी वकील संघाचे उपाध्यक्ष कमलाकर तांदुळजे आणि लता झोंबाडे (कांबळे), सहसचिव विजय सुराडकर, सदस्य निकड बनकर, विनोद डोंगरे, अमोल घोडेराव, अनिता करमनकर, महेश काथार, रमेश मोरे, सुनील पडूळ, अस्मा शेख, संभाजी तवार, दिनेश वाघमारे यांनी परिश्रम घेतले.