corona vaccination : विदेशात उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 16:52 IST2021-06-02T16:50:23+5:302021-06-02T16:52:18+5:30
corona vaccination : शहरातील तीन आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

corona vaccination : विदेशात उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम
औरंगाबाद : विदेशात उच्चशिक्षणासाठी जाण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम ३ ते ५ जूनदरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
तीन आरोग्य केंद्रांवर व्यवस्था
बन्सीलालनगर, चेतनानगर आणि नाथ सुपर मार्केट औरंगपुरा या आरोग्य केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. ३ ते ५ जूनदरम्यान तीन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे.
खासगी रुग्णालयांकडे ओढा
शहरात चार खाजगी रुग्णालयांनी लस देण्यास सुरुवात केली आहे. मागील आठ ते दहा दिवसांमध्ये विदेशात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी पैसे देऊन लस घेतली. याशिवाय आणखी काही विद्यार्थी लसअभावी थांबलेले आहेत. लस घेतल्यानंतर दुसरा डोस ८४ दिवसांनंतर मिळणार आहे. पहिला डोस लवकरात लवकर घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.