शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

अजिंठा लेणीतील पर्यटनाला कोरोनाचा फास; ५०० कुटुंबांच्या रोजीरोटीवर गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 08:35 IST

यंदा जोरदार पाऊस झाल्याने निसर्गसौंदर्याची मुक्त हस्ते उधळण करीत आहे; परंतु त्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकच नसल्याने येथील रम्यपणा हरवून सन्नाटा बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देनिसर्गसौंदर्याची उधळण, पण पर्यटकच नाहीत पाच महिन्यांपासून अनेकजण बेरोजगार

- उदयकुमार जैन

औरंगाबाद  : कोरोनामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी गेल्या पाच महिन्यांपासून बंद असल्याने येथील पर्यटनावर अवलंबून असलेल्या परिसरातील ५०० कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथे येणारा पर्यटकच येथील व्यावसायिकांसाठी ‘अतिथी देवो भव’ असला तरी कोरोनाने त्याची वाट रोखल्याने लेण्याचे अर्थकारण शून्यावर आले आहे. 

१७ मार्चपासून लेणी बंद असल्याने येथील चलनच बंद झाले आहे. वास्तविक यंदा जोरदार पाऊस झाल्याने निसर्गसौंदर्याची मुक्त हस्ते उधळण करीत आहे; परंतु त्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकच नसल्याने येथील रम्यपणा हरवून सन्नाटा बघायला मिळत आहे. १५ आॅगस्टनंतर येथील ‘पीक सीझन’ सुरू होतो आणि तो फेब्रुवारीपर्यंत चालतो. वर्षभरात सरासरी साडेतीन लाख भारतीय व ५० हजार विदेशी पर्यटक येथे भेट देत असतात. याशिवाय शैक्षणिक सहलींच्या रूपाने ५० हजारांवर विद्यार्थी, शिक्षकमंडळी येथे येतात. यातून जवळपास पाच कोटींची आर्थिक उलाढाल होते; परंतु यंदा ती कोरोनामुळे ठप्प झाली आहे. याचा फास मात्र स्थानिक कामगार, मजूर, नोकर, व्यावसायिकांना बसला आहे. आजघडीला त्यांना पर्यायी रोजगारही उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर प्रथमच एवढे भीषण संकट ओढवले आहे.

दैनंदिन धांडोळा लेणीच्या टी-पॉइंटवर पर्यटकांना खरेदीसाठी ७८ दुकाने महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाने बांधून दिली आहेत. शिवाय पार्किंग, एमटीडीसी व भारतीय पुरातत्व विभागाचे लेणी दर्शन तिकीट, डझनभर प्रदूषणमुक्त बस, उपाहारगृहे, ढाबे, लॉज, एमटीडीसीचे हॉलीडे रिसॉर्ट, रिक्षाचालक,  सफाई कामगार, ४० डोलीवाले, १०० फेरीवाले, १० गाईड,  पोस्ट कार्ड व गाईड बुक विक्रेते, भेळपुरीचालक, रंगीबेरंगी दगड विक्रेते, पादत्राणे दुकाने, नाश्ता व टी स्टॉल असा येथील एकंदरीत धांडोळा. याच माध्यमातून दररोज लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. यातून परिसरातील फर्दापूर, अजिंठा गाव, सावरखेडा, लेणापूर, ठाणा, वरखेडी, पिंपळदरी येथील जवळपास ५०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो; परंतु १७ मार्चनंतर हे चलन येणे बंद झाल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 

गेल्या १६० दिवसांपासून नैराश्य आणि चिंतायाबाबत येथील व्यावसायिक जयेश बत्तिसे, रमेश पाटील, धनलाल मंडावरे, संजय जाधव, राजू कापसे, योगेश शिंदे, सय्यद राजिक हुसेन, शेख रफिक शेख जाफर, महेबूब पठाण, शकूलाल लव्हाळे, भगवान जाधव, शिवाजी जाधव, प्रकाश हातोळे, हसन बाबा, शेख फईम शेख मुस्तफा, सय्यद लाल, रज्जाक तडवी, अफसर पठाण, शेख अलीम शेख बुºहाण, राजू शर्मा, शेख अकील, रफिकखाँ कादरखाँ, अ. रहेमान, हकीमखा आजमखाँ, सज्जादखाँ गुलाबखाँ, तसेच डोलीचालक चंदू आरक, विष्णू सपकाळ, विजय बिरारे, युवराज दामोदर यांनी सांगितले की, आम्ही १६० दिवसांपासून चक्क घरात बसून आहोत. त्यामुळे उपासमारीची वेळ कुटुंबांवर आली आहे. घरातील सदस्य व आम्ही दुसरीकडे रोजंदारीवरही जायला तयार आहोत, पण कुठेही रोजगार नसल्याने चिंतेने नैराश्य आले आहे. कुटुंबांचे रहाटगाडगे चालविण्यासाठी कर्जबाजारी झालो असून, आता पैसेही संपले आहेत. लेणी सुरू झाल्यावरच आमदनी सुरू होणार आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करायला हवी.

आर्थिक संकटाचे सलग तिसरे वर्षगेल्या २ वर्षांपासून रस्त्याच्या समस्येमुळे आधीच पर्यटक येणे कमी झाले आहे. त्यात यंदा कोरोनाने भर टाकली. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही निराशा पदरी पडली. येथील अर्थचक्र थांबल्याने एमटीडीसीने दुकानदारांचे दोन वर्षांचे भाडे माफ करावे, वीज बिल माफ करावे, बँकेने बिनव्याजी कर्ज द्यावे, शासनाने विशेष बाब म्हणून येथे आर्थिक पॅकेज द्यावे, प्रकल्पधारकांना ९९ वर्षांच्या करारावर संपादित केलेली शेती कसायला द्यावी, परिसरात शासन व एमटीडीसीने रोजगारनिर्मिती करावी, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फेडरेशनच्या माध्यमातून आपण यासाठी प्रयत्न करणार आहोत.-पपींद्रपालसिंग वाय.टी. (माजी अध्यक्ष अजिंठा लेणी दुकानदार संघटना व एटीडीएफ सदस्य)

एमटीडीसीलाही लाखोंचा फटकाअजिंठा लेणीतील आमचे उपाहारगृह, पर्यटक निवास व इतर सुविधा केंद्रे बंद असल्याने लाखोंचा फटका बसला आहे; परंतु उत्पन्न बंद असले तरी कुठल्याही कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढलेले नाही. त्यांच्या माध्यमातून सर्व मेन्टेन ठेवले आहे. लेणी सुरू होताच येणाऱ्या पर्यटकांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही. -अखिलेश शुक्ला, प्रादेशिक महाव्यवस्थापक, महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळ.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनcorona virusकोरोना वायरस बातम्या