मराठवाड्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST2021-05-05T04:07:34+5:302021-05-05T04:07:34+5:30
औरंगाबाद : मराठवाड्याची परिस्थिती नियंत्रणात येत असून, ऑक्सिजन, बेड्स आणि इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू असल्याचे विभागीय आयुक्त ...

मराठवाड्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येतेय
औरंगाबाद : मराठवाड्याची परिस्थिती नियंत्रणात येत असून, ऑक्सिजन, बेड्स आणि इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू असल्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले. केंद्रेकर यांनी मंगळवारी मराठवाड्याचा दौरा केला. अंबाजोगई, बीड आणि उस्मानाबादमधील परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत परिस्थिती ठीक आहे. परंतु बीडमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. इंजेक्शनचा पुरवठा कमी - जास्त होत आहे. ते मिळविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. बेड, ऑक्सिजन बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. रुग्णांवर उपचार होतील, एवढ्या सुविधा सध्या आहेत. औरंगाबाद पूर्वपदावर येत असले तरी बाहेरून येणारी रुग्ण संख्या मोठी आहे. १५ ते १७ टक्के रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. ऑक्सिजन उत्पादक, उद्योजकांच्या मागण्यांबाबत सोमवारी चर्चा केली. ऑक्सिजन निर्मितीचा एक प्रकल्प लवकर सुरू होईल. त्यांना लागणाऱ्या साहित्य पुरवठ्याबाबत चर्चा केली.