शहरातील बेघर नागरिकांची कोरोना तपासणी सुरू
By | Updated: December 5, 2020 04:07 IST2020-12-05T04:07:23+5:302020-12-05T04:07:23+5:30
प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पाच निवारागृहातील सुमारे दीडशे व्यक्तींची आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारपासून निवारागृहातील ...

शहरातील बेघर नागरिकांची कोरोना तपासणी सुरू
प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पाच निवारागृहातील सुमारे दीडशे व्यक्तींची आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारपासून निवारागृहातील बेघर व्यक्तींची कोरोना चाचणी सुरु केली आहे. पहिल्या दिवशी २२ बेघर व्यक्तींची चाचणी केली असता एकजण पॉझिटिव्ह निघाला. शुक्रवारी देखील निवारागृहातील बेघर व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त होणार आहे.
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
औरंगाबाद : केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार १७ जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हे व सर्व महापालिका क्षेत्रांत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी बीओपीव्ही व्हॅक्सिन वापरण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी पालिका आरोग्य विभाग सज्ज आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
रेल्वे, विमानाने आलेल्या २१८ प्रवाशांची तपासणी
औरंगाबाद : महानगरपालिकेतर्फे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने शासन निर्देशानुसार रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. विशेष करून दिल्ली येथून येणाऱ्या सचखंड एक्सप्रेसच्या प्रवाशांची चाचणी करण्यात येत आहे. ४ डिसेंबर रोजी १९४ आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आले. गुरुवारी केलेल्या चाचणीत एकही पॉझिटिव्ह आढळून आला नाही. चिकलठाणा विमानतळ येथे २४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. केलेल्या तपासणीत एकही पॉझिटिव्ह आढळून आला नाही.
७ हजार घरांचे मनपाकडून सर्वेक्षण
औरंगाबाद : कोरोना संसर्गासोबतच डेंग्यूसह इतर साथरोगांच्या प्रतिबंधासाठीही महापालिकेच्या आरोग्य विभागाला विविध उपाययोजना राबवाव्या लागत आहेत. शासन आदेशान्वये पालिका काही महिन्यांपासून सातत्याने विशेष अॅबेटिंग मोहीम राबवत आहे. याअंतर्गत शुक्रवारी शहरातील नऊ प्रभागांत ७ हजार ४८३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २२७ डेंग्यूच्या डास उत्पत्तीची स्थाने आढळून आली. औषध फवारणी करत मलेरिया विभागाच्या आरोग्य पथकांनी ती नष्ट केली.