शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

corona in Aurangabad : रेमडेसिविर इंजेक्शन चोर पालिकेतीलच ?; स्टोअर विभागातील ५ जणांना कारणे दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 1:41 PM

remdesivir black marketing महापालिकेने बंगळुरू येथील मायलँन कंपनीकडून १० हजार रेमडेसिविरची खरेदी केली होती. हा साठा महापालिकेच्या भवानीनगर येथील स्टोअर रूममध्ये ठेवला होता.

ठळक मुद्दे‘रेमडेसिविर’ चोरी प्रकरणात ५ जणांना कारणे दाखवा४८ रेमडेसिविरची चोरी, संशयाची सुई स्टोअरकडेइंजेक्शन बदलले, स्टोअर विभागातच ही प्रक्रिया होणे शक्‍य

औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमधील रुग्णांना देण्यात येणाऱ्या ४८ रेमडेसिविर इंजेक्शन्सची चोरी झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. भवानीनगर येथील स्टोअरमधून इंजेक्शन्स चोरीला गेल्याचे प्रथमदर्शनी प्रशासनाला वाटत आहे. या संशयाच्या सुईमुळेच स्टोअर विभागातील ५ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सायंकाळी उशिरा सर्वांना नोटीस प्राप्त झाली. १७ एप्रिल रोजीच ''लोकमत''ने महापालिकेच्या मॅल्ट्रोन हॉस्पिटलमध्ये गरजेपेक्षा जास्त रेमडेसिविरचा वापर होत असल्याचे उघडकीस आणले होते.

महापालिकेने बंगळुरू येथील मायलँन कंपनीकडून १० हजार रेमडेसिविरची खरेदी केली होती. हा साठा महापालिकेच्या भवानीनगर येथील स्टोअर रूममध्ये ठेवला होता. २० एप्रिल रोजी या स्टोअरमधून मेल्ट्रोन हॉस्पिटलला १२६२ इंजेक्शन्स पाठविण्यात आली. एका बॉक्समध्ये ४८ इंजेक्शन्स असलेले एकूण २६ बॉक्स पाठविण्यात आले. एका खुल्या डब्यात १४ इंजेक्शन्स होती.

मेल्ट्रॉन हॉस्पिटलमधील फार्मासिस्टने २३ एप्रिल रोजी रेमडेसिविर इंजेक्शनची तपासणी केली, तेव्हा एका बॉक्समध्ये रेमडेसिविर इंजेक्शनऐवजी एमपीएस नावाचे दुसरेच इंजेक्शन ठेवण्यात आले होते. एका खोक्यात ४८ रेमडेसिविर इंजेक्शन्स नसून त्याऐवजी दुसरीच इंजेक्शन्स असल्याची बाब फार्मासिस्टने रुग्णालयाच्या प्रमुखांना त्वरित सांगितली.

महापालिकेकडून प्राथमिक तपासणी२३ एप्रिल रोजी ४८ इंजेक्शन्स चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर भांडार विभागाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण राठोडकर त्यांनी मेल्ट्रॉन रुग्णालयात आणि भवानीनगर येथील स्टोअरमध्ये जाऊन कसून तपासणी केली. मात्र इंजेक्शन्स सापडली नाहीत. यानंतर वरिष्ठांना घटनेची माहिती देण्यात आली. मंगळवारी सायंकाळी महापालिका प्रशासकांनी इंजेक्शन वाटपातील सहभागींना कारणे दाखवा नोटीस देण्याचा निर्णय घेतला.

एमपीएस इंजेक्शन महापालिकेनेच खरेदी केलेलेमेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या एमपीएस इंजेक्शनचा बॅच क्रमांक तपासला असता, तो साठा महापालिकेनेच खरेदी केला असल्याचे समोर आले. म्हणजेच भवानीनगर येथील स्टोअर रूममध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला.

या ५ जणांना नोटीस...भांडार विभागाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण राठोडकर, औषध निर्माण अधिकारी व्ही. डी. रगडे, प्रणाली कोल्हे, दीपाली दाणे, आरोग्य सहायक अनंत देवगिरीकर या ५ जणांचा यात समावेश आहे. प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे जाहीर केले. मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत त्यांना नोटीस मिळाली नव्हती. मात्र या प्रकरणात गरज पडली तर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येईल, असे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले.

''लोकमत'' ने व्यक्त केला होता संशयशहरात रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण भटकत असताना महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये दररोज ३५० पैकी ३०० रुग्णांना इंजेक्शन देण्यात येत आहेत, या प्रकारावर ''लोकमत''ने १७ एप्रिलच्या अंकात संशय व्यक्त केला होता.

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका