करंजखेड्यात कोरोला लसीकरणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:05 IST2021-04-07T04:05:27+5:302021-04-07T04:05:27+5:30
ग्रामीण भागात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ग्रामीण भागात आता लसीकरण करण्यात येत आहे. ...

करंजखेड्यात कोरोला लसीकरणाला प्रतिसाद
ग्रामीण भागात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ग्रामीण भागात आता लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेची माहिती घेण्यासाठी कन्नड तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी डाॕॅ. श्रीकृष्ण वेणीकर, तालुका आरोग्य अधिकारी डाॕॅ. हेमंत गावंडे, विस्तार अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच नियमांचे उल्लंघन करणारांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही यावेळी दिला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॕॅ. मेघा शेवगण, डाॕॅ. शरयू चव्हाण, डाॕॅ. सिद्धांत लहासे, पर्यवेक्षक संजय भोसले, सुभाष कुऱ्हांडे, संदीप ढाकणे, प्रिया बारगळ, एस. डी. अहिरे, एम. एस. भिवसणे, सय्यद अली आहेमद, अन्सारी अख्तर आदींची उपस्थिती होती.