कोपर्डीच्या आरोपींना फासावर लटकविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:07 IST2021-07-14T04:07:38+5:302021-07-14T04:07:38+5:30
औरंगाबाद : कोपर्डीच्या भगिनीवर अत्याचार करून, तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेला आज पाच वर्षे पूर्ण झाले, तरी नराधमांना अद्यापही ...

कोपर्डीच्या आरोपींना फासावर लटकविण्याची मागणी
औरंगाबाद : कोपर्डीच्या भगिनीवर अत्याचार करून, तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेला आज पाच वर्षे पूर्ण झाले, तरी नराधमांना अद्यापही फासावर लटकविण्यात आले नाही. न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी करा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करण्यात आली.
कोपर्डीच्या घटनेला पाच वर्षे झाल्याच्या निमित्ताने जिजामाता कन्या विद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या भगिनीला श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ज्या दिवशी या नराधमांना फाशी दिले जाईल, तो दिवस खऱ्या श्रद्धांजलीचा असेल, असेही मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी सतीश वेताळ, मनोज गायके, डॉ.शिवानंद भानुसे, रमेश गायकवाड, विजय काकडे, रेखा वहाटुळे, सुकन्या भोसले, मनीषा मराठे, राखी सुरडकर, सुवर्णा तुपे, धनश्री भोसले, वैशाली खोपडे, अजय गंडे, अंकित चव्हाण, योगेश औताडे, सुनील कोटकर, भारत कदम, रवि काळे आदींची उपस्थिती होती.
(फोटोसह)