शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव मुदतीमुळे शेतकऱ्यांची सोय

By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST

सेनगाव/कळमनुरी : राष्ट्रीय पीकविमा योजनेअंतर्गत विमा भरण्यास मुदतवाढ मिळाल्याने पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे.

सेनगाव/कळमनुरी : राष्ट्रीय पीकविमा योजनेअंतर्गत विमा भरण्यास मुदतवाढ मिळाल्याने पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. सेनगाव तालुक्यातील ४ हजार २९९ शेतकऱ्यांनी ३४ लाख ९० हजार रूपयांचा पीकविमा भरला आहे. पावसाने दडी मारल्याने तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. तब्बल दीड महिना पेरणीस विलंब झाला असून, दुबार पेरणीचे संकट डोकावत असताना राष्ट्रीय पीकविमा योजनेत ३१ जुलैपर्यंत तालुक्यातील ४ हजार २९९ शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत ३४ लाख ९० हजार रूपयांचा पीकविमा भरला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचा पीकविमा शेतकऱ्यांनी भरला आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत कळमनुरी तालुक्यातील ४ हजार ९३१ शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा उतरविला. विम्याची रक्कम ३६ लाख ९४ हजार एवढी आहे. पुन्हा पीकविमा उतरविण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला असून, शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविणे गरजेचे आहे. त्याकरिता यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा उतरविण्याचे आवाहनही काळे यांनी केले आहे. पीकविमा उतरविण्यासाठी १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कळमनुरी शाखेत १५०० शेतकऱ्यांनी ७ लाख ४५ हजार, आखाडा बाळापूर ९१६ शेतकऱ्यांनी ८ लाख ५५ हजार, कोंढूर येथे ९० शेतकऱ्यांनी ६१ हजार, नांदापूर येथे २२५ शेतकऱ्यांनी १ लाख ९५ हजार, डोंगरकडा येथे ९०० शेतकऱ्यांनी ५ लाख ८८ हजार, पोत्रा येथे १०० शेतकरी ९५ हजार, वारंगाफाटा येथे ५०० शेतकरी ५ लाख ७० हजार, गौळबाजार येथे ७०० शेतकरी ५ लाख ९० हजार असे एकूण ४ हजार ९३१ शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस या पिकांचा ३६ लाख ९४ हजारांचा विमा उतरविला आहे. सोयाबीनसाठी हेक्टरी ६०२ रुपये कापूस हेक्टरी २ हजार ७५६ रुपये, तूर ४६८ रुपये, मूग ३०३, उडीद ३२८ रुपये प्रमाणे विमा उतरविला आहे. शेतकऱ्यांनी पिकविमा १५ आॅगस्टपर्यंत उतरवा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी काळे यांनी केले आहे. (वार्ताहर)आता १५ आॅगस्टपर्यंत विमा काढा राष्ट्रीय पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा भरण्याची ३१ जुलै ही अंतिम मुदत होती. यंदा हिंगोली जिल्ह्यात पाऊस लांबल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत.पेरणीपूर्वी पीकविमा कसा भरणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. पीकविमा भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत होती. या मागणीची दखल घेत पीक विम्याची मुदत १५ आॅगस्टपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात आली आहेत.बिकट स्थितीत ३१ जुलैपर्यंत विका भरणाऱ्या ४ हजार २९० शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर झाला तर ९ कोटी ८५ लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळेल. पीकविमा न काढलेल्या व १ आॅगस्टनंतर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी १५ आॅगस्टपर्यंत पीकविमा भरावा, असे आवाहन सेनगावचे तालुका कृषी अधिकारी आर.बी.हरणे यांनी केले आहे.