धार्मिक स्थळांच्या आक्षेपांची छाननी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:01 IST2017-09-08T01:01:43+5:302017-09-08T01:01:43+5:30
शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीवर दाखल करण्यात आलेल्या आक्षेपांच्या छाननीचे काम सुरू असल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी गुरुवारी दिली.

धार्मिक स्थळांच्या आक्षेपांची छाननी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीवर दाखल करण्यात आलेल्या आक्षेपांच्या छाननीचे काम सुरू असल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी गुरुवारी दिली.
सुरुवातीला ८०३ आक्षेप आले होते. गेल्या महिन्यात १०५६ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर ११०७ आक्षेप आले. त्याची छाननी करण्याचे काम सहा पथकांमार्फत होत आहे. छाननी झाल्यानंतर धार्मिक स्थळांचे वर्गीकरण होेईल. न्यायालयात सादर केलेल्या वेळापत्रकानुसार त्यानंतर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
मनपाने हायकोर्टाच्या आदेशाने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली होती. ४३ ठिकाणी कारवाई केल्याचा अहवाल मनपाने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केला. त्यावेळी शासनाच्या अध्यादेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीवर आलेल्या आक्षेपांवर सुनावणी घेण्यासाठी वेळ देण्याची विनंती एका शपथपत्राद्वारे न्यायालयात करण्यात आली होती. अनधिकृत धार्मिक स्थळांवर आगामी काळात मनपातर्फे कशी कारवाई करण्यात येईल, याचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने आक्षेपांवर सुनावणी घेण्यास मुभा दिली आहे.