पुलाचे कठडे तोडून कंटेनर वीरभद्रा नदीत कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:05 IST2021-09-23T04:05:31+5:302021-09-23T04:05:31+5:30
पैठण : नदीवरील पुलाचे कठडे तोडून कंटेनर वीरभद्रा नदीत कोसळल्याची घटना शहागड - पैठण रोडवरील नवगाव बुधवारी सायंकाळी ७ ...

पुलाचे कठडे तोडून कंटेनर वीरभद्रा नदीत कोसळला
पैठण : नदीवरील पुलाचे कठडे तोडून कंटेनर वीरभद्रा नदीत कोसळल्याची घटना शहागड - पैठण रोडवरील नवगाव बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच उडी मारल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, पैठण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कंटेनर नदीपात्रातून बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू केली होती.
शहागडहून एक कंटेनर (एमएच २० एल ६९१२) बुधवारी (दि. २२) औरंगाबादकडे भरधाव वेगाने निघाला होता. नवगाव येथे चालक दुर्गेश यादव (रा. आजमगढ, उत्तर प्रदेश) याचे नियंत्रण सुटून कंटेनर एका झाडाला धडकून पुलाचे कठडे तोडत थेट वीरभद्रा नदीत कोसळला. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. दरम्यान, वीरभद्रा नदीला पूर आलेला असल्याने कंटेनर वाहत जाऊन थोड्या अंतरावरील झुडपात अडकला. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक किशोर पवार, फौजदार रामकृष्ण सागडे, जमादार सुधीर ओव्हळ आदींनी घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी येथून क्रेन बोलावून स्थानिक नागरिकांच्या मदतीने कंटेनर नदी बाहेर काढण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कंटेनर रिकामे असल्याचे चालक दुर्गेश यादवने सांगितले.
फोटो :