बांधकाम मजुराला सरसकट रेशन, पाच हजार द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:02 IST2021-04-19T04:02:01+5:302021-04-19T04:02:01+5:30

राज्य सरकारने १५ दिवसांचा लॉकडाऊन लागू केल्यामुळे असंघटित कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. सरकारने बांधकाम कामगारांना व घरकाम ...

Construction workers should be given full ration, five thousand | बांधकाम मजुराला सरसकट रेशन, पाच हजार द्यावेत

बांधकाम मजुराला सरसकट रेशन, पाच हजार द्यावेत

राज्य सरकारने १५ दिवसांचा लॉकडाऊन लागू केल्यामुळे असंघटित कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. सरकारने बांधकाम कामगारांना व घरकाम करणाऱ्या महिलांना १५०० रुपये देऊ केले आहेत.

जिल्ह्यातील जवळपास लाखभर बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत. त्या सर्व कामगारांना सरसकट किमान पाच हजार रुपये व रेशन मोफत द्यावे.

याचबरोबर घरकाम करणाऱ्या महिलांची संख्यादेखील मोठी आहे. पाच वर्षांपूर्वी घरेलू महिला कामगार मंडळाकडे जवळपास २५ हजार महिलांची नोंदणी होती. नंतर मंडळ कार्यरत नसल्यामुळे महिलांची नवीन नोंदणी व नूतनीकरण करणे बंद झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला नोंदणीपासून वंचित राहिल्या आहेत.

घरेलू महिलांचीदेखील सरसकट कोणतीही नूतनीकरणाची अट टाकू नये.

नोंदणी व नूतनीकरण तत्काळ सुरू करावे, अशी मागणी घरेलू महिला मोलकरीण संघटना, इमारत बांधकाम कामगार फेडरेशन आयटकच्यावतीने मधुकर खिल्लारे आदींनी केली आहे.

Web Title: Construction workers should be given full ration, five thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.