फार्मा टर्मिनल्सची उभारणी
By Admin | Updated: November 17, 2015 00:33 IST2015-11-17T00:21:31+5:302015-11-17T00:33:29+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्योग, शेती व्यवसायातील माल आयात-निर्यात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने कामाला गती मिळाली आहे

फार्मा टर्मिनल्सची उभारणी
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्योग, शेती व्यवसायातील माल आयात-निर्यात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने कामाला गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळावर फार्मा टर्मिनल्सची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे त्याचा औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.
केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला आणि चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि एअर कार्गोची सुविधा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीच्या जागी एअर कार्गोची सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो कॉम्प्लेक्समध्ये रूपांतर केले जाणार आहे. निविदा प्रक्रिया आणि अन्य बाबी पूर्ण होऊन उद्योग, शेती व्यवसायातील माल आयात-निर्यात करण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा प्रत्यक्षात डिसेंबरपर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक तसेच शेतकऱ्यांना थेट औरंगाबादहून मालाची आयात-निर्यात करणे शक्य होणार आहे. कार्गो सेवेच्या दृष्टीने विमानतळावर फार्मा टर्मिनल्सची उभारणी केली जाणार आहे. ‘सीएमआयए’चे पदाधिकारी आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक पार पडली. यावेळी एअर कार्गो,फार्मा टर्मिनल्ससह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.