निधी मिळूनही बांधकाम रखडले

By Admin | Updated: April 14, 2016 00:58 IST2016-04-14T00:46:44+5:302016-04-14T00:58:50+5:30

\वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील पद्मावती येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या तीन वर्ग खोल्यावरील एक वर्षापूर्वी वादळी वाऱ्यात शाळेवरील पत्रे उडून गेली होती.

The construction ended with funding | निधी मिळूनही बांधकाम रखडले

निधी मिळूनही बांधकाम रखडले


\वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील पद्मावती येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या तीन वर्ग खोल्यावरील एक वर्षापूर्वी वादळी वाऱ्यात शाळेवरील पत्रे उडून गेली होती. शाळा दुरूस्तीसाठी निधी मिळूनही किरकोळ कारणामुळे दुरूस्ती रखडली आहे.
एक वर्षापासून विद्यार्थ्यांनी वऱ्हाड्यांत बसून ज्ञानार्जन केले. परंतु शिक्षण विभागाला वारंवार मागणी करून शाळेची दुरूस्ती करण्यात आली नव्हती. सध्या शिक्षण विभागाने आठ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. परंतु बांधकामासाठी निधी कमी देण्यात आल्याने शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षासह सदस्यांनी आक्षेत घेत वाढीव निधी देण्याची मागणी केली आहे. आलेला निधी परत जाण्याची वेळ आली आहे. शालेय समिती आणि शिक्षण विभागाच्या हेवदाव्यात विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने चित्र आहे.
अनेक वेळा आंदोलन केले शाळाच भोकरदन पंचायत समिती कार्यालयात भरवली. परंतु केवळ पोकळ आश्वासनेच मिळाली. यामुळे विद्यार्थ्यांना वर्गखोल्या नसल्याने नाईलाजाने अंगणात शाळा भरवावी लागली. परंतु प्रशासनाकडून कुठलीच हालचाल झाली नाही. प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. याशिवाय काहीच उत्तरे मिळाली नाहीत. पाठपुरावा करुन निधी आणला. परंतु तो निधी अपुरा असल्याने शाळा तसेच शालेय समिती तो निधी स्वीकारण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. (वार्ताहर)
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी सांगितले, शाळा बांधकामसाठी निधी आला परंतु तो निधी अपुरा आहे. त्यात पूर्ण काम होत नाही. आम्ही करारनामापत्रक देऊ शकत नाही. जो निधी आला तो जुना २०११ चा असल्याने आम्हाला वाढीव निधी द्यावा, अशी मागणी आमची आहे.
४ अंदाजपत्रकाची मागणी केली तर दाखवत नाहीत. फक्त करारनामा करुन द्या असे सांगतात. परंतु अंदाजपत्रक दाखवत नाही.यामुळे आम्ही करारनामा करुन देत नाही. एकूणच वर्ग खोल्या बांधकामासाठी वाढीव निधी देण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
अभियंता वाढेकर यांनी सांगितले,पद्मावती शाळेला निधी मंजूर आहे. २ वर्ग खोल्या बांधण्यासाठी सदर निधी २०१०-११चा आहे. आठ लाख पंचवीस हजार रुपये मंजूर आहेत. व्यवस्थापन समिती अध्यक्षानी करारनामा करुन द्यावा. कामास सुरूवात करावी. सदर निधीत शाळेचे बांधकाम करता येते. विद्यार्थ्यांची गैरसोय थांबेल.

Web Title: The construction ended with funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.