साथ रोगाचा जिल्ह्याला विळखा
By Admin | Updated: August 28, 2014 01:40 IST2014-08-28T01:28:11+5:302014-08-28T01:40:29+5:30
लातूर : जिल्ह्यात जून महिन्यापासून हिवतापाचे २० रुग्ण आढळले. यात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ चिकुनगुनियाचे ५ रुग्ण तर डेंग्यूचे २४ रुग्ण आढळले असून, यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे़

साथ रोगाचा जिल्ह्याला विळखा
लातूर : जिल्ह्यात जून महिन्यापासून हिवतापाचे २० रुग्ण आढळले. यात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ चिकुनगुनियाचे ५ रुग्ण तर डेंग्यूचे २४ रुग्ण आढळले असून, यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे़ आॅगस्ट महिन्यात १० रुग्ण डेंग्यूचे पॉझिटिव्ह आले आहेत़ अजून ३० रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी गुरुवारी पाठवण्यात येणार आहेत़ हिवताप, चिकुनगुन्या, डेंग्यूच्या साथरोगाने त्रस्त झाले असून या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़
लातूर जिल्हात जून महिन्यापासून ते सद्य:स्थितीत हिवताप, चिकुनगुनिया, डेंग्यूच्या साथरोगाने नागरिक हैराण झाले आहेत़ लातूर महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात सपशेल अपयशी ठरत आहे़ शहरात कचरा व घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ त्याचा परिणाम म्हणून शहरात साथरोग प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे़ तापीचे लक्ष्मी कॉलनी ११ रुग्ण तर गाजीपुरा भागात ९ रुग्ण असे २० रुग्ण आढळून आले. त्यातील २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे़ ग्रामीण भागातही तापीचे १४ रुग्ण आढळून आले आहेत़ चिकुनगुन्याचे बन सावरगाव येथील ११ तापाचे रुग्ण आढळून आले़ अकराही रुग्णांच्या रक्तजल नमुन्याची तपासणी सेंटिनल सेंटर नांदेड येथे तपासणीसाठी पाठवले असता़, त्यापैकी ५ रुग्ण चिकुनगुनिया दूषित आढळून आले़ हे ५ ही रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत़
जून महिन्यात ४० रक्तजल नमूने तपासणीसाठी पाठवले असता त्यात ६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले़ जुलै महिन्यात ४५ संशयीत रुग्णाचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यातील ८ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले़ आॅगस्ट महिन्यात २२ संशयीत रुग्णाचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यातील १० रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले़ दुसऱ्या लॉटमध्ये ३० संशयित रुग्णांचे रक्तजल नमूने तपसणीसाठी गुरुवारी पाठवण्यात येणार आहेत़ १० रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली आहे़ त्यातील ८ रुग्ण शहरातील असून २ रुग्ण हे ग्रागीण भागातील म्हाडा कॉलनी व शंकरवाडी येथील आहेत़ डेंग्यूची रुग्ण संख्या शहरात झपाट्याने वाढत असून गुरुवारी अजून ३० डेंग्यू संशयीत रुग्णांची रक्तजल नमुने तपसणीसाठी पाठवण्यात येणार आहेत़ त्याचा अहवाल आल्यानंतरही रुग्णसंख्येत वाढ होवू शकते़ या साथ रोगांनी शहरातील व जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ रुग्णसंख्येत होणारी वाढ पहाता साथ रोग नियंत्रण विभाग व आरोग्य विभागाची अकार्यक्षमता दिसून येत आहे़ (प्रतिनिधी)