केंद्राच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

By Admin | Updated: December 20, 2015 00:10 IST2015-12-20T00:00:07+5:302015-12-20T00:10:04+5:30

औरंगाबाद : काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी शहागंज येथील गांधी पुतळ्याजवळ केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली.

Congress's protest against the Center | केंद्राच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

केंद्राच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

औरंगाबाद : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी शहागंज येथील गांधी पुतळ्याजवळ केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपविरोधी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
तत्पूर्वी गांधी भवन पक्ष कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अरुण मुगदिया, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केशवराव औताडे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम, माजी आमदार कल्याण काळे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशाला पारतंत्र्यामधून मुक्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. काँग्रेसचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९३८ साली नॅशनल हेरॉल्डची स्थापना केली. त्या काळापासून या वृत्तपत्राने राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळविले होते; परंतु आता काही जणांनी या वृत्तपत्राच्या पाठीमागून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा हा डाव आखला आहे. त्यासाठी कायदेशीर संभ्रम निर्माण केला जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. त्यानंतर गांधी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात वरील पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास औताडे, माजी महापौर सुदाम सोनवणे, मनपाचे गटनेते भाऊसाहेब जगताप, जिल्हा परिषदेचे सभापती विनोद तांबे, माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे, शिक्षक सेलचे अध्यक्ष मनोज पाटील, अ‍ॅड. एकबालसिंग गिल, एनएसयूआयचे अध्यक्ष सागर साळुंके, युवक काँग्रेस लोकसभेचे अध्यक्ष प्रभाकर मुठ्ठे पाटील, सेवादलाचे शहर अध्यक्ष आतिश पितळे, प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष हमद चाऊस, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष खालेद पठाण, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे, शोभा खोसरे, पूर्व विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत पठाण, जगन्नाथ काळे, जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल सोनवणे, नगरसेवक शेख सोहेल, शेख नवीद, डॉ. पवन डोंगरे, माजी नगरसेवक शकील पटेल, अजीज खोकर, जमील अहेमद खान, राजेश मुंडे, अनिल मानकापे, बाळासाहेब भोसले, सय्यद अफजल हुसेन, बाबा तायडे, मोईन हर्सूलकर, सय्यद आसिफ, शेख कैसर आदी सहभागी होते.

Web Title: Congress's protest against the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.