काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन

By Admin | Updated: August 7, 2015 01:14 IST2015-08-07T01:10:34+5:302015-08-07T01:14:35+5:30

लातूर : लोकसभेतील काँग्रेस पक्षाच्या २५ खासदारांना केंद्र शासनाने निलंबित केले आहे. त्याचा निषेध जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला असून,

Congress party's dharna agitation | काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन

काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन


लातूर : लोकसभेतील काँग्रेस पक्षाच्या २५ खासदारांना केंद्र शासनाने निलंबित केले आहे. त्याचा निषेध जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला असून, निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. गांधी चौकात झालेल्या धरणे आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर हुकूमशाही पद्धतीने कामकाज सुरू आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या २५ खासदारांचे निलंबन हे हुकूमशाहीचेच द्योतक आहे, असा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. २५ खासदारांचे निलंबन रद्द करण्यात यावे, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये मराठवाड्यावर अन्याय झाला असून, ज्या शहरात भाजपाची सत्ता आहे, त्या शहराचीच स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आली आहे. अनेक निर्णय राजकीय दुजाभाव करणारे आहेत. या शासनाच्या विरोधात जनतेमध्ये संताप आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन काँग्रेसने केले.
धरणे आंदोलनात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, एस.आर. देशमुख, माजी आ. वैजनाथ शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष बी.व्ही. मोतीपवळे, महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, संतोष देशमुख, नरेंद्र अग्रवाल, बाळासाहेब देशमुख, नारायण लोखंडे, दगडूसाहेब पडिले, दत्तात्रय बनसोडे, सर्जेराव मोरे, लालासाहेब चव्हाण, राजकुमार पाटील, गोविंद बोराडे, बिरबल देवकते, अ‍ॅड. खुशालराव सूर्यवंशी, रमेश हलकुडे, संजय निलेगावकर, अल्ताफ शेख, देविदास बोरुळे, सिकंदर पटेल, हरिराम कुलकर्णी, नरेश पंड्या, सुपर्ण जगताप, माधव गंभिरे, कमलाबाई मिटकरी, विजयालक्ष्मी कांबळे, किसनराव लोमटे, प्रदीपसिंह गंगणे, केशरबाई महापुरे, व्यंकटेश पुरी, रावसाहेब भालेराव, मनोज चिखले, रामचंद्र सुडे, दत्ता मस्के, रोहित दयाल, सय्यद रफिक, भानुदास डोके, सय्यद अशादुल्ला, सांब महाजन, डॉ. निलेश नवगिरे, बिभीषण सांगवीकर, राजाभाऊ मोरे, श्रीराम अराध्ये, हणमंत जाकते, नीळकंठ गावकरे, चंद्रकांत टेकाळे, संभाजी रेड्डी, लक्ष्मण मोरे, निखिल लोहकरे, किसन लोमटे, शामराव सूर्यवंशी, श्रीनिवास शेळके आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Congress party's dharna agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.