‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे ४२ जागांवर एकमत’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 04:45 IST2018-10-26T04:44:31+5:302018-10-26T04:45:26+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर ४२ जागांबाबत एकवाक्यता झाली आहे.

‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे ४२ जागांवर एकमत’
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर ४२ जागांबाबत एकवाक्यता झाली आहे. काही जागांत अदलाबदल होईल. औरंगाबादच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
२०१४ साली राष्ट्रवादीचे ४१, तर काँग्रेसचे ४२ आमदार आणि काँग्रेसचे दोन व आमचे चार खासदार निवडून आले. त्यामुळे लोकसभेच्या ५० टक्केजागांसाठी आम्ही आग्रही आहोत, असे पवार यांनी सांगितले.
पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडून मागून घ्यावा, असे पक्षाचे सांगत आहेत. मात्र, येथील चारही जागा आम्ही लढविल्या, तर काँग्रेसने काय करायचे, असा सवाल करीत पुणे मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील, हे पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. औरंगाबादची जागा गेल्या काही निवडणुकांपासून काँग्रेस हरत आहे. त्यामुळे या जागेबाबत आम्ही आग्रही आहोत, असेही पवारांनी स्पष्ट केले.