कॉंग्रेसला मिळाले मताधिक्य

By Admin | Updated: May 18, 2014 01:25 IST2014-05-18T01:20:03+5:302014-05-18T01:25:21+5:30

नांदेड लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत देगलूर - बिलोली मतदारसंघातून कॉंग्रेस उमेदवार अशोकराव चव्हाण यांना २ हजार ३३७ मताधिक्य मिळू शकले.

Congress gets majority vote | कॉंग्रेसला मिळाले मताधिक्य

कॉंग्रेसला मिळाले मताधिक्य

मतदारसंघाचा आमदार कॉंग्रेस पक्षाचा तसेच जिल्हा परिषद, नगरपरिषद व पंचायत समिती, बाजार समिती या स्थानिक स्वराज्य संस्था कॉंग्रेस व राष्टÑवादीकडे असताना नांदेड लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत देगलूर - बिलोली मतदारसंघातून कॉंग्रेस उमेदवार अशोकराव चव्हाण यांना २ हजार ३३७ मताधिक्य मिळू शकले. लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांना ७५ हजार ८३ तर भाजपाचे डी. बी. पाटील यांना ७२ हजार ७४६ एवढी मते मिळाली. भारतीय जनता पक्षाच्या पक्ष संघटनेची देगलूर तालुक्यात झालेली पुरती वाताहात, शिवसेनेतील गटबाजी याचा मताधिक्य मिळविण्यासाठी कॉंग्रेसला लाभ होवू शकला असता़ परंतु याही परिस्थितीत या मतदारसंघाची जबाबदारी असलेले आ़अमरनाथ राजूरकर यांनी डॅमेज कंट्रोल केले़ याला खुद्द अशोकरावांनी दुजोरा दिला़ त्याचवेळी खा़भास्करराव पाटील खतगावकर यांनीही चांगले काम केल्याची पावती नेत्यांनी दिली़ परंतु मताधिक्याचा आकडा मोठा राहिला नाही हेही मान्य करावे लागेल़ कॉंग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्टÑवादीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांचे तन एकीकडे आणि मन एकीकडे अशी परिस्थिती असताना व्यक्तिगत संपर्क व छोट्या छोट्या सभांच्या माध्यमातून प्रचार करणार्‍या अशोकराव चव्हाण यांच्या विजयाचे खरे शिलेदार अशोकरावच ठरले. माजी आ. सुभाष साबणे, उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांच्या गटाने दमदार प्रचार मोहीम राबविली ती आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच. नांदेड येथे झालेली नरेंद्र मोदी यांची मोठी सभा आणि पक्ष संघटनेचे अस्तित्व शून्य असताना भाजपा उमेदवारास मिळालेले मतदान हा केवळ मोदी लाटेचाच परिणाम म्हणावा लागेल.

Web Title: Congress gets majority vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.