सेनगावात काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:43 IST2017-09-12T00:43:36+5:302017-09-12T00:43:36+5:30

शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी सोमवारी खा. राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.

Congress Front in Senga | सेनगावात काँग्रेसचा मोर्चा

सेनगावात काँग्रेसचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी सोमवारी खा. राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.
तालुका काँग्रेसच्या वतीने शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी येथील सातारकर महाराज सभागृहातून दुपारी १ वा. तहसीलवर धडक मोर्चा काढला. खा. राजीव सातव, आ.डॉ.संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी नेतृत्व केले. राज्य व केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात येत होत्या. शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकºयांच्या मुलांना उच्चशिक्षण मोफत द्या, ६० वर्षांच्या पुढील ज्येष्ठ शेतकºयांना पेन्शन द्यवी, २४ तास वीजपुरवठा द्यावा, सोयाबीनला जाहीर केलेले प्रतिक्ंिवटल २०० रुपये अनुदान त्वरीत द्यावे, शौचालयाचे अनुदान सरसकट द्यावे अशा २० मागण्या मांडल्या. तहसीलवर या मोर्चाचे रूपांतर धरणे आंदोलनात झाले.
या मोर्चात तालुक्यातील शेतकरी, निराधार महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात आ. टारफे, जिल्हाध्यक्ष बोंढारे यांच्यासह पक्षनिरीक्षक अमर खानापुरे, माजी जि.प.अध्यक्षा सरोजनी खाडे, माजी जि.प.सदस्य विनायकराव देशमुख, डॉ. रवी पाटील, भागोराव राठोड, भास्कर बेंगाळ, नगरसेवक विलास खाडे, डॉ.नीळकंठ गडदे, अशोक सरनाईक, प्रकाश वाघ, डॉ.माणिक देशमुख, श्यामराव जगताप, जि.प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते, प्रवीण पायघन, विजय ठोंबरे, विठ्ठल शिंदे, दिलीप होडबे, अजय विटकरे, श्रीरंग कायंदे, अशोकराव सानप, नीळकंठ मुंडे, शेख जुबेर, अमरदीप कदम, सतीश झुंगरे, पंडित देशमुख, शेख मुनीर आदी सहभागी झाले होते.
यावेळी तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देण्यात आले. स्थानिक स्तरावरील मागण्यांचा विचार केला जाईल. मात्र शासन स्तरावरील मागण्यांबाबत शासनाकडे निवेदन पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या मोर्चादरम्यान पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर, नर्सीचे ठाणेदार बालाजी येवते, फौजदार वंदना विरणर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दुपारी ३ वाजता मोर्चा व धरणे आंदोलनाची सांगता केली.

Web Title: Congress Front in Senga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.