शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस,सेना,मनसे उमेदवारांचे अर्ज

By admin | Updated: September 26, 2014 00:43 IST

नांदेड : विधानसभा निवडणुकीत घटस्थापनेच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांनी गुरूवारी शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले़

नांदेड : विधानसभा निवडणुकीत घटस्थापनेच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांनी गुरूवारी शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले़ यात काँग्रेसच्या विद्यमान चार आमदारांसह सर्वच पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता़विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यास २० सप्टेंबरपासून प्रारंभ झाला असला तरी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी पितृपक्ष पंधरवाड्यात उमेदवारी दाखल करण्यास पसंती दर्शविली नाही़ आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील एकुण नऊ विधानसभा मतदारसंघातून गुरुवारी ६६ इच्छुकांनी ९१ नामनिर्देशनपत्रे दाखल केली़ किनवट मतदारसंघ-६, हदगाव-३, भोकर-४, नांदेड उत्तर-१५, नांदेड दक्षिण-१६, लोहा-४, नायगाव-४, देगलूर-९, मुखेड-५ एकुण ९१ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले़ गुरुवारी प्रामुख्याने काँग्रेस पक्षाकडून पालकमंत्री डी़ पी़ सावंत, आ़ ओमप्रकाश पोकर्णा, आ़ माधवराव पाटील जवळगावकर, आ़ हणमंत पाटील बेटमोगरेकर, शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, माजी आ़ प्रताप पाटील चिखलीकर, मनसेकडून अ‍ॅड़ दिलीप ठाकूर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर यांचा समावेश होता़ काँग्रेसचे नांदेड उत्तरचे उमेदवार आ़ सावंत यांची वर्कशॉपपासून तर नांदेड दक्षिणचे उमेदवार आ़ पोकर्णा यांनी चौफाळा येथून रॅली निघाली़ माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल केली़ सेनेचे हेमंत पाटील यांनीही जुन्या नांदेडातून रॅली काढून उमेदवारी दाखल केली़ मनसेचे अ‍ॅड़ दिलीप ठाकूर यांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली़ त्यांनी तरोडा नाका येथून रॅली काढली़दरम्यान, शुक्रवारी बसपाचे सुरेश गायकवाड हे नांदेड उत्तर मतदारसंघातून तर मनसेचे प्रकाश मारावार हे नांदेड दक्षिण मतदारसंघातून तसेच मनोहर धोंडे हे लोह्यात अर्ज दाखल करतील़उमेदवारी दाखल करण्यासाठी २७ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे़ शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होणार आहे़ (प्रतिनिधी)