शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
4
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
5
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
6
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
7
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
8
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
9
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
10
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
11
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
12
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
13
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
14
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
15
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
16
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
17
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
18
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
19
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
20
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची सरकारविरोधी निदर्शने

By admin | Updated: November 29, 2014 00:29 IST

लातूर : महाराष्ट्र विधीमंडळात बहुमत सिध्द करताना संविधानातील तरतुदी तसेच लोकशाही मुल्यांचा अनेकवेळा भंग झाला़ लोकशाहीतील संकेताचे पालन व्हावे यासाठी काँगे्रस


लातूर : महाराष्ट्र विधीमंडळात बहुमत सिध्द करताना संविधानातील तरतुदी तसेच लोकशाही मुल्यांचा अनेकवेळा भंग झाला़ लोकशाहीतील संकेताचे पालन व्हावे यासाठी काँगे्रस पक्षाने सुरू केलेला लढा दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय़ याकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने गुरूवारी गांधी चौकात निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांच्या नेतृत्वात गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले़ विधानसभा निवडणुकीनंतर विधीमंडळात बहुमतासाठी आवश्यक १४५ इतके संख्याबळ नसतानाही आवाजी मतदानाचा गैरवापर करीत प्रचंड गदारोळात बहुमत सिध्द करीत भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला़ बहुमत सिध्द करताना भारतीय संविधानातील तरतुदी पायदळी तुडवत असंवैधानिक पध्दतीने सरकार सत्तेत आले़ सरकारकडून झालेल्या घटनात्मक पायमल्लीकडे राज्यपालांचे लक्ष वेधताना काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले़ सरकारच्या सत्तेत येण्याच्या पध्दती व त्यानंतर सुरू असलेली दंडेलशाहीची कारकिर्द भारतीय राज्य घटनेचा व लोकशाही मुल्यांचा अवमान असल्याचे सांगत जनतेचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने लातूर शहरातील गांधी चौकात आंदोलन करण्यात आले़ प्रारंभी महात्मा गांधी, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़ यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा़ बी़व्ही़मोतीपवळे, महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, मनपा गटनेते नरेंद्र अग्रवाल, सभापती गिरीष पाटील, नगरसेवक राजकुमार जाधव, पप्पू देशमुख, सुधाकर साळुंके, दिपक सूळ, छायाताई चिंदे, विभाग अध्यक्ष संजय निलेगावकर, दगडू मिळकरी, प्रा़एम़बी़पठाण, दत्ता मस्के, भानुदास डोेके, अशोक देडे, राजू मस्के, अ‍ॅड़ बाबासाहेब गायकवाड, विवेक सिरसाट, अहेमदखाँ पठाण, पृथ्वीराज सिरसाट, सुपर्ण जगताप, अल्ताफ शेख, सचिन बंडापल्ले, केशरबाई महापुरे, विजयालक्ष्मी कांबळे, सय्यद रफिक, कमलाकर मिटकरी, फकरूद्दीन पटेल, मैनोद्दीन शेख, युथ काँगे्रसचे पुतीन पाटील, आसीफ बागवान, महेश बिडवे, राजू मस्के, सय्यद रफिक अब्दुल गणी, अ‍ॅड़ प्रदीप ंगगणे, मुशबीर टाके, अमोल माने, निखील लोकरे, अनंत चौधरी आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)४
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लातूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह महापौर, उपमहापौर, नगरसेवक अन्य पदाधिकारी गांधी चौकात एकत्र आले़ त्यानंतर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ जवळपास अर्धा तास गांधी चौकात घोषणाबाजी झाल्यावर काँगे्रस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले़ याठिकाणी निवेदन देऊन कार्यकर्ते निघून गेले़ आंदोलनाची सवय नसलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक तासांतच आंदोलन गुंडाळलं़