शेतकºयांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:19 IST2017-08-30T00:19:51+5:302017-08-30T00:19:51+5:30

कर्जमाफीतील जाचक अटींमुळे शेतकºयांना कर्जमाफी मिळेल की नाही, याची शाश्वतीच नाही. आत्महत्यांच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा खा. राजीव सातव यांनी दिला आहे.

 Congress aggressor on the issue of farmers | शेतकºयांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक

शेतकºयांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कर्जमाफीतील जाचक अटींमुळे शेतकºयांना कर्जमाफी मिळेल की नाही, याची शाश्वतीच नाही. आत्महत्यांच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा खा. राजीव सातव यांनी दिला आहे.
हिंगोलीत शासकीय विश्रामगृहात पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. संतोष टारफे, प्रदेश सचिव अब्दुल हाफीज, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, अ‍ॅड. बाबा नाईक, जि.प. गटनेते दिलीप देसाई, विनायक देशमुख, नारायण खेडकर, बापूराव बांगर, शेख नेहाल हाजी इस्माईल, विलास खाडे, जनार्दन पतंगे, गजानन पोहकर, वनिता गुंजकर यांची उपस्थिती होती.
खा. राजीव सातव म्हणाले, समाजातील अनेक घटक केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे नाराज आहेत. परिणामी, शिक्षक, व्यापारी, डॉक्टर, विद्यार्थी, शेतकºयांची आंदोलने होत आहेत. आघाडी सरकारनेही कर्जमाफी केली होती. मात्र शेतकरी कुटुंबांना कधी रांगेत उभे केले नव्हते. भाजप सरकारच्या विरोधातील रोषाला वाचा फोडण्यासाठी आपण प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने जबाबदारी घेऊन समाजातील सर्व घटकांसह शेतकºयांच्या प्रश्नावर प्रत्येक तालुक्यात ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान आंदोलनाचा इशारा दिला. यात अर्धनग्न, मुंडण, रास्ता रोको, धरणे आंदोलनाचा समावेश राहील.
आ. संतोष टारफे म्हणाले, सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांत रोष असून कर्जमाफीत सध्या होणारी लूट शेतकºयांच्या जिव्हारी लागली आहे. तुरीची खरेदी झाली नाही अन् सोयाबीनच्या अनुदानाचाही पत्ता नाही. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, घरकुल, गणवेश, स्वच्छता अभियानात शौचालय बांधकामाची रक्कम, ठिबक सिंचनचे अनुदान, निराधारा, वीज, उच्चशिक्षण आदी योजनांसाठी सरकारकडे पुरेसा निधी नाही. यामुळे विकास कामे ठप्प पडली असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत आंदोलनाचे तालुकानिहाय नियोजन केले. यावेळी श्यामराव जगताप, नंदकिशोर तोष्णीवाल, डॉ. रवि पाटील गोरेगावकर, डॉ. सतीश पाचपुते, कैलास साळुंके, भगवान खंदारे, संजय राठोड, असद कादरी, रमेश जाधव, जिया कुरेशी, संतोष राजे गोरे, फारुख बागवान, भागोराव राठोड, अरुण वाढवे, प्रशांत गायकवाड, धनंजय पाटील, केशव नाईक, दत्ता कदम, प्रा. पारडकर, सतीश खाडे, विलास गोरे, विक्रम पतंगे, विश्वास बांगर, दिलीप होडवे, आरेफलाला, शेख आलीम, मुजीब कुरेशी आदीची उपस्थिती होती.

Web Title:  Congress aggressor on the issue of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.