शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

कोरोना काळात काँग्रेस सक्रिय, राष्ट्रवादी काँग्रेस दिसतेय निष्क्रिय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 19:53 IST

ऐन कोरोना काळातच जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेसच्या नेतृत्वात बदल झाले.

ठळक मुद्दे काँग्रेसचे नवे नेतृत्व उमेदीने लागलेय कामालादुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कोरोनाच्या  काळात शांत जाणवत आहे.

- स.सो. खंडाळकर

औरंगाबाद : कोरोना काळात काँग्रेस सक्रिय,  तर राष्ट्रवादी काँग्रेस निष्क्रिय झाल्याचे चित्र निदान औरंगाबाद शहरात व  जिल्ह्यात दिसून येत आहे. ऐन कोरोना काळातच जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेसच्या नेतृत्वात बदल झाले. नवे नेतृत्व उमेदीने कामाला लागलेले दिसते आहे.

काँग्रेस अलीकडे रस्त्यावर उतरून आंदोलनेही करीत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर काँग्रेसने जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. यापूर्वी पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ तालुका पातळीवर जाऊन निदर्शने केली. केंद्र, प्रदेशकडून काँग्रेसला सतत कार्यक्रम दिले जात आहेत. हे कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी  त्या-त्या जिल्ह्याच्या व शहराच्या अध्यक्षांवर येऊन पडते. 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कोरोनाच्या  काळात शांत जाणवत आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे किंवा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शहरात दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी होते हा भाग निराळा; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडे काँग्रेसच्या तुलनेत कमीच कार्यक्रम दिसून येत आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण आणि शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे हे राष्ट्रवादीचे. यांचा मतदारसंघ संपूर्ण मराठवाडा जरी असला तरी त्यांचे वास्तव्य औरंगाबादेत आहे. हे दोघेही आमदार सध्यातरी पक्षाच्या दृष्टिकोनातून  जिल्ह्यात फारसे सक्रिय नसल्याचे दिसते. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास पाटील हे वेळ मिळेल तसे राष्ट्रवादी भवन पक्ष कार्यालयात बसतात. शहराध्यक्ष विजय साळवे यांचा प्रारंभी उत्साह होता; परंतु आता ते सक्रिय  नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कदीर मौलाना यांच्या शिफारसीने विजय साळवे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन साळवे यांना बदलण्यात यावे व त्यांच्या जागी मुस्लिम शहराध्यक्ष नेमावा असा सूर वाढला असल्याचे कळते.

काँग्रेसच्या विविध आघाड्याही कार्यरत काँग्रेसच्या विविध सेल विभागाचे कार्यक्रमही सध्या वाढलेले आहेत. काँग्रेसच्या दिव्यांग सेलतर्फे दिव्यांगांचे प्रश्न ऐरणीवर आणले गेले, तर काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने निदर्शने करून उत्तर प्रदेशात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना झालेल्या अटकेचा निषेध नोंदवला.शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणप्रसंगी उपस्थित राहून वाटेत औरंगाबाद मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी व नंतर पत्रकारांशीही संवाद साधला. शिक्षण क्षेत्रातले अनेक प्रश्न घेऊन विविध शिष्टमंडळेही त्यांना भेटली. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मंत्री कोरोना काळात औरंगाबादकडे फिरकला नाही. अपवाद फक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा. 

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabadऔरंगाबाद