पैठण न.प.च्या सभेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:01 IST2017-12-22T23:01:38+5:302017-12-22T23:01:46+5:30
पैठण नगरपालिकेच्या मासिक सभेत शनिवारी दुपारी काँग्रेस नगरसेवक, भाजप नगरसेविकेच्या पतीने अधिकाºयांना कार्यालयात अर्वाच्य भाषेत शिवगाळ करुन गोंधळ घातला. सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्यानंतर हा प्रकार घडला.

पैठण न.प.च्या सभेत गोंधळ
पैठण : पैठण नगरपालिकेच्या मासिक सभेत शनिवारी दुपारी काँग्रेस नगरसेवक, भाजप नगरसेविकेच्या पतीने अधिकाºयांना कार्यालयात अर्वाच्य भाषेत शिवगाळ करुन गोंधळ घातला. सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्यानंतर हा प्रकार घडला.
संबंधित नगरसेवकाविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी २६ डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा पालिका कर्मचारी संघटनेने दिला आहे. काँग्रेसचे नगरसेवक हसन्नोदीन कट्यारे यांनी नगर अभियंता निजाद्दीन शेख यांना शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली. तर भाजप नगरसेविका सविता माने यांचे पती निवृत्ती ऊर्फ बाळासाहेब माने यांनी मुख्याधिकाºयांच्या दालनाच्या दरवाजाला लाथ मारून दालनात जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत गोंधळ घातला. या प्रकरणी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार केली आहे. या घटनेचा निषेध करत संबंधित नगरसेवकाविरुध्द कारवाई करण्यात यावी नसता कर्मचारी संघटना २७ डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.