सार्वजनिक शौचालयासाठी होणार जागेची निश्चिती

By Admin | Updated: July 22, 2014 00:16 IST2014-07-21T23:51:28+5:302014-07-22T00:16:33+5:30

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा २५ जुलै रोजी महापौर स्मिता खानापुरे यांनी आयोजित केली आहे़

Confirmation of the place for public toilets | सार्वजनिक शौचालयासाठी होणार जागेची निश्चिती

सार्वजनिक शौचालयासाठी होणार जागेची निश्चिती

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा २५ जुलै रोजी महापौर स्मिता खानापुरे यांनी आयोजित केली आहे़ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या सभेत पाणीटंचाई, महापुरूषांच्या पुतळ्यांच्या सुशोभिकरणासह ११ विषयांवर शिक्कामोर्तब होणार आहे़ भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने शासनास सादर केलेल्या प्रस्तावास कार्योत्तर मंजुरी देण्यात येणार आहे़
मागील दोन वर्षांपासून लातूर शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात अपुऱ्या पावसामुळे अत्यल्प पाणीसाठा होता़
सध्या तीव्र पाणीटंचाई असल्याने रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी प्रकल्पावरून १८४ द़ल़लि़क्षमतेची पाणीपुरवठा योजना पाणीटंचाई अंतर्गत कार्यान्वित करणेबाबत शासनास पाठविलेल्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता, आयआयटी मुंंबईकडून लातूर शहर पाणीपुरवठा योजनेचे पाण्याचे लेखा परीक्षण करून घेण्यास पाठविलेल्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता, लातूर शहराच्या हद्दीमध्ये आवश्यकतेनुसार जागा निश्चित करून सार्वजनिक शौचालय बांधणे, मनपा हद्दीलगत चारही बाजूंना स्मशानभूमी सुविधा निर्माण करण्यासाठी जमीन खरेदी करणे, बँकेमार्फत कर्ज घेणाऱ्या मालमत्ताधारकांचे मनपा अभिलेखात कर्जाचा बोजा नोंद घेण्यासाठी सध्या आकारल्या जात असलेल्या शुल्काबाबत पुनर्विचार करून निर्णय घेणे, मालमत्ता कराची रक्कम आगाऊ भरणाऱ्यास सुट देण्याबाबत निर्णय घेणे, केंद्र शासनाच्या सोलार सिटी योजनेत लातूर शहराचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो शासनास सादर करण्यास मान्यता देणे, शासनामार्फत १३ वा वित्त आयोग व प्राथमिक सोयी सुविधा योजनेतून उपलब्ध झालेल्या अनुदानाच्या विनियोग करण्याबाबत सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येणार आहे़
२५ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण यातील किती विषय मार्गी लागतात, याकडे लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)
पुतळ्यांचे सुशोभिकरण...
छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयासमोरील महात्मा बसवेश्वर पुतळा नूतनीकरण व सुशोभिकरण करणे, हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा लातूर शहरात उभारण्यासाठी जागा निश्चित करून उभा करण्याविषयी सर्वसाधारण निर्णय होण्याची शक्यता आहे.

Web Title: Confirmation of the place for public toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.