औरंगाबाद : अंतर्मना आचार्य प्रसन्नसागरजी महाराज यांनी जैन धर्मातील महत्त्वाचे महाकाव्य भक्तांबर पाठाचे ५० दिवस अखंड निरंकार उपवास व एकांतात मौनव्रत साधना केली. ही तपस्या पूर्ण झाल्यानंतर संगस्थ मुनिश्री पियुषसागरजी महाराज यांच्या निर्दशानुसार देशभरातील १ लाख, ८० हजार गुरुभक्त घरूनच ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून भक्तांबरचे पाठ, अंतर्मना वाणी साधना करीत पारणा महोत्सवात सहभागी झाले होते.पुष्पगिरी तीर्थ प्रणेता आचार्य पुष्पदंत सागरजी महाराज यांच्या उपवनातील सुगंधीत पुष्प भारत गौरव अंतर्मना आचार्य प्रसन्न सागरजी महाराज व सौम्यमूर्ती पियुष सागरजी महाराज यांचा २०२० चातुर्मास उत्तर प्रदेशातील मुरादनगर येथे सुरू असून त्यांच्या सानिध्यात अंतर्मना आचार्य प्रसन्न सागरजी महाराज यांनी भक्तांबर पाठाची साधना केली. सोमवारी उपवासाच्या ५० व्या दिवशी त्यागी व व्रति, नियम पालन करणाऱ्या संकल्पित भक्तांद्वारे विधिपूर्वक अन्नपाणी घेऊन त्यांनी उपवासाची सांगता केली. आता मौनच राहण्यात फायदा आहे. बाहेरचे वातावरण अजून काही काळ सुुधारेल असे वाटत नाही. त्यामुळे रहा बाहेर व जीवन जगा आंतरआत्म्याचे, असा संदेश अंतर्मना प्रसन्नसागरजी महाराज यांनी दिला.या पारणा महोत्सवास आर्यिका गननी ज्ञानमती माताजी, कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला, आ. विजयरत्न सुंदर सुरीश्श्वर मसा यांचे अनुमोदना पत्र प्राप्त झाले व व्रताधिकारी स्वस्तीश्री रविंद्रकिर्तीजी स्वामी व सुशिल जैन मैनपुरी यांनी गुरुदेव प्रति विनयांजली वाहिली. यावेळी हस्तीनापुरचे भट्टारक, स्वस्ति श्रीं रविंंद्रकिर्ती स्वामी, ब्र. गिता दिदी, अंतर्मना आचार्यश्रींची पुर्वाश्रमणीची आई शोभादेवी अज्जुभैया सेठी, सजन बंटी जैन, आदींची उपस्थिती होती.अंतर्मना आचार्य प्रसन्नसागरजी महाराज यांनी यांनी यापूर्वी १६, ३२, ३५, ६४, १८६, दिवसांची कठोर उपवास व मौनव्रत साधना सानंद संपन्न केलेली आहे.
आचार्य प्रसन्नसागर महाराजांच्या भक्तांबर पाठाची सांगता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 03:46 IST