शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विभागीय प्रशासनाची मजबुरी; कंपन्यांच्या हाती पीक विम्याची दोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 19:13 IST

कंपन्यांची पीकविमा देण्याबाबत अजून हालचाल नाही

ठळक मुद्दे७६ तालुक्यांतील अहवाल तयार

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पदरी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा कंपन्यांकडून पीक विम्यापोटी अजून काहीही पडलेले नाही. विभागीय आयुक्त प्रशासनाने पूर्णत: ७६ तालुक्यांतील नुकसान आणि विम्याची सरासरी याचा अहवाल शासनाकडे पाठविला असून, याबाबत सांख्यिकी विभाग आणि विमा कंपन्यांना निर्णय घ्यायचा आहे. सदरील यंत्रणेने अजून तरी काहीही निर्णय घेतलेला नाही. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पंधरवड्यात मराठवाड्यात १६ हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, तसा निर्णय अजून तरी झालेला नाही. ३३८ कोटी रुपयांची रक्कम आठ विमा कंपन्यांकडे भरली आहे. त्यातून १४ हजार ४७७ कोटी रुपये ही रक्कम विमा संरक्षणाची आहे. सरलेल्या खरीप हंगामात अंदाजे ३९ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली होते.

विभागीय आयुक्तांनी विमा कंपन्यांची झाडाझडती घेतल्यानंतरही त्या कंपन्यांनी अजून मोबदला देण्याबाबत सुरुवात केली नसल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. पीक विमा योजना केंद्राच्या अखत्यारीत आहे. योजनेचे कामकाज पुण्यातील सांख्यिकी विभागप्रमुखांच्या अंतर्गत चालते. जोपर्यंत तेथून काही निर्णय होत नाही, तोवर शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडणार नाही, असे बोलले जात आहे. मराठवाड्यातील सुमारे १ लाखांहून अधिक एकर जमिनीवरील खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेल्या पिकांचा अवकाळी पावसामुळे चिखल झाला. शेतकऱ्यांनी अंदाजे १५ ते २० हजार कोटींच्या आसपास केलेली गुंतवणूक ओल्या दुष्काळामुळे वाया गेली असून, सरकारी मदतीवरच शेतकऱ्यांच्या रबी हंगामाची मदार आहे. ८१९ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली. ३,३५० कोटींच्या मागणीच्या तुलनेत ही मदत तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांना राज्य, केंद्र सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा सध्या आहे. 

७६ तालुक्यांतील क्लेम कृषी आयुक्तांकडे पहिल्या टप्प्यातील अनुदान पूर्णपणे वाटप झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान अजून प्राप्त झालेले नाही. विमा कंपन्यांचे क्लेम सगळे कृषी आयुक्तांकडून जात आहेत. पूर्ण जिल्ह्यातून ते पाठविले जात आहेत. ७६ तालुक्यांतील क्लेम जेडीएमार्फत कृषी आयुक्त व आयुक्तांकडून कंपन्यांकडे पाठविले जात आहेत. विमा कंपन्यांना अहवाल देण्याचे काम प्रशासनाने १०० टक्के केले आहे. विमा कंपन्यांचा व्यवसाय आहे, त्यामुळे त्या किती तत्परतेने विमा मोबदला वाटप करतील याबाबत प्रशासन सांगू शकणार नाही.- पराग सोमण, महसूल उपायुक्त, औरंगाबाद विभाग 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरी