धान्य महोत्सवाला संमिश्र प्रतिसाद
By Admin | Updated: May 14, 2014 23:53 IST2014-05-14T23:47:03+5:302014-05-14T23:53:27+5:30
हिंगोली : लग्नसराई आणि कडक उन्हाळ्यात ठेवलेल्या धान्य व फळे महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला.

धान्य महोत्सवाला संमिश्र प्रतिसाद
हिंगोली : लग्नसराई आणि कडक उन्हाळ्यात ठेवलेल्या धान्य व फळे महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला. फळांत आंबा तर धान्यात भाजीपाल्यांचा बोलबाला राहिला. काही स्टॉल्सवर डाळी तर काही स्टॉल फळांपासून प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे दिसून आले. बाजाराचा दिवस लक्षात घेवून भरविलेल्या या महोत्सवाला जिल्हावासियांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या संयुक्त विद्यमाने रामलीला मैदानावर १३ व १४ मे दरम्यान धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवातून मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी-विक्री होण्याची अपेक्षा कृषी विभागाची होती; परंतु महोत्सवाला मध्यम प्रतिसाद मिळाला. धान्याऐवजी भाजीपाल्याचे स्टॉल अधिक दिसून आले. बहुताश स्टॉल फळांपासून बनविलेल्या पदार्थांचे होते. ज्वारी, गहू, तांदूळ, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी धान्य महोत्सवात दिसून आले नाहीत. फळांमध्ये आंब्याच्या पलीकडे इतर फळे दृष्टीस पडली नाहीत. कच्चे आणि पिकलेले आंब्याचे स्टॉल अधिक प्रमाणात होते. बाजाराच्या तुलनेत येथील केसर आंबा स्वस्त होता. कच्चा आंबा ४० रूपये तर पिकलेला आंबा ८० रूपये किलो दराने विकला जात होता. महोत्सवात सर्वाधिक आंब्याची विक्री झाली. कारण बाजारात आंब्याचे अधिक भाव आणि हमीचा आंबा मिळेनासा झाला. काही जणांनी सोयाबीनचे बियाणे विक्रीसाठी आणले होते. कुदरत जातीचे असलेले बियाणे पेरणीऐवजी लागवड करण्यासाठी फायदेशीर असल्याचे एकनाथ हिंगमिरे यांनी सांगितले. गतवर्षी एका एकरात ५ किलो बियाण्याला १८ पोत्यांचा उतार आल्याचे त्यांनी सांगितले. कापसाच्या बियाण्यातील बोलगार्ड कंपनीचा एकमेव स्टॉल दिसून आला. स्टॉलवर जावून विचारपूस करण्याची तसदी देखील शेतकर्यांनी घेतली नाही. बाजारात दुप्पटीपेक्षा कमी दराने डाळी रमेश पंडित यांनी महोत्सवात विकल्या. तूर दाळ ४० तर १ किलो बेसनच्या पॅकसाठी ४० रूपये दर ठेवला होता. दुसरीकडे फळांपासून विविध पदार्थ तयार करणार्या जालना येथील एका कंपनीचा स्टॉल लक्षवेधी ठरला. दिवसेंदिवस लुप्त होत असलेल्या घोंगडी विक्रीसाठी ठेवल्या होत्या. बर्यापैकी प्रतिसाद या स्टॉलला मिळाला. पुस्तकांच्या स्टॉलने देखील अनेकांचे लक्ष वेधले. महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्या संयुक्त विद्यमाने रामलीला मैदानावर १३ व १४ मे दरम्यान धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन केले होते. पहिलाच प्रयोग असलेल्या या महोत्सवाला मध्यम प्रतिसाद मिळाला. धान्याऐवजी भाजीपाल्याचे स्टॉल अधिक दिसून आले. तसेच बहुतांश स्टॉल फळांपासून बनविलेल्या पदार्थांचे होते; परंतु ज्वारी, गहू, तांदूळ, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी धान्य दिसून आले नाहीत. फळांमध्ये आंब्याच्या पलीकडे इतर फळे दृष्टीस पडली नाहीत. कच्चे आणि पिकलेले आंब्याचे स्टॉल अधिक प्रमाणात होते. मात्र बाजाराच्या तुलनेत येथील केसर आंबा स्वस्त असून कच्चा आंबा ४० रूपये तर पिकलेला आंबा ८० रूपये किलो दराने विकला गेला. फळांपासून विविध पदार्थ तयार करणार्या जालना येथील एका कंपनीचा स्टॉल लक्षवेधी ठरला. तूर दाळ ४० तर १ किलो बेसनच्या पॅकसाठी ४० रूपये होता दर.